रोटरी क्लब तर्फे वाकेथॉन व नारीशक्ती पुरस्काराचे आयोजन

रोटरी क्लब तर्फे वाकेथॉन व नारीशक्ती पुरस्काराचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता वाकेथोन व कर्करोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध संस्था जसे इनरव्हील क्लब,आर्य वैश्य महिला महासभा मंडळ, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, आयुवर्धन फिटनेस सेंटर, वसुंधरा ग्रुप ,जिजाऊ ब्रिगेड, उदगीर डॉक्टर्स फोरम वुमेन्स विंग, सखी मंच अशा विविध संस्थांचा यामध्ये समावेश आहे.तसेच सायंकाळी 4.00 वाजता नारी शक्ती पुरस्कार वितरण सोहळा शिवनंद फंक्शन हॉल बिदर गेट उदगीर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या दोन्ही कार्यक्रमासाठी उदगीर व परिसरातील सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आवाहन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष रो. रामेश्वर नीटुरे, सचिव रो. व्यंकटराव कणसे, प्रोजेक्ट चेअरमन रो.महानंदा सोनटक्के तसेच सर्व संचालक मंडळ व सदस्य यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!