आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित

आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील मौजे बामणी आणि भातांगळी या दोन गावातील पाच कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक 11 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते बामणी येथे 1 कोटी 52 लक्ष रुपये खर्चाच्या जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर नल, नल से शुद्ध जल” योजनेचे भूमिपूजन, सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज मंदिर, बुद्ध विहार, पाईपलाईन, नाली बांधकाम, मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, जाना नदीवरील पुलाचे बांधकाम, आमदार निधीतून खंडोबा मंदिर सभागृहाचे बांधकाम, जिल्हा वार्षिक योजनेतून कब्रस्तानचे कंपाउंड वॉल, नाली, रस्ता, पंचायत समिती पंधराव्या वित्त आयोगातून फेवर ब्लॉक,तांडा वस्तीतून सिमेंट रस्ता आदी कामाचे तसेच सकाळी 10 वाजता भातांगळी येथे 3 कोटी 48 लक्ष रुपये खर्चाच्या “जल जीवन मिशन” अंतर्गत “हर घर नल, नल से शुद्ध जल” योजना , सामाजिक न्याय विभाग अंतर्गत नाली रस्ता मूलभूत सुविधे अंतर्गत डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन आणि आमदार निधीतून बांधण्यात आलेले समाज मंदिर, वार्षिक योजनेतून शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य इमारत दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, जिप आणि पंस 15 वित्त आयोगातून रस्ता नाली विद्युतीकरण सोलार, रस्ते विकास अंतर्गत भडी ते भातांगळी आणि भातांगळी ते चिकलठाणा रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास आ. रमेशआप्पा कराड यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी बामणी, भातांगळी गावातील आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांनी, भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!