एलसीबीची धडाकेबाज मोहीम, मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक!!

एलसीबीची धडाकेबाज मोहीम, मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक!!

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अत्यंत उत्कृष्टपणे एकापाठोपाठ एक चोरी, घरपोडी, जबरीचोरी असे प्रकार उघडकीस आणत आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत परवाच फिर्यादीला मारहाण करून त्याच्या जवळचा मोबाईल पळउन फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा विशेष पथकाने अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, गेली चार महिन्यापूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीत एका मोटार सायकल स्वारास अडवून, मारहाण करून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 499/2022, कलम 392, 34 भा. द. वि. या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे सुदर्शन अविनाश चव्हाण (वय 23 वर्ष राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर) यास आष्टा मोड परिसरातून चोरलेला मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना, ताब्यात घेऊन विचारपूस केली.तेंव्हा त्याने चार महिन्यापूर्वी उदयगिरी हॉस्पिटलच्या परिसरातील एका पायी जाणाऱ्या इसमास मारहाण करून, त्याचा मोबाईल आणखीन एक साथीदार नामे उदय विजय गिरी (वय 20 वर्ष राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर)अशा दोघांनी मिळून जबरीने लुटले आहे, असे कबूल करून आरोपी सुदर्शन चव्हाण याने गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि गुन्हे करताना वापरलेली यामाहा मोटरसायकल असा एकूण 1,15,000/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला,तो पोलिसांनी जप्त केला आहे.

त्यावरून नमूद आरोपी सुदर्शन चव्हाण यास मुद्देमालासह आष्टा मोड परिसरातून तर आरोपी उदय गिरी यास उदगीर मधून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजू मस्के, जमीर शेख, नितीन कठारे यांनी केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!