महात्मा बसवेश्वर घरा-घरात पोहचावा म्हणून ग्रंथ लिखाण – प्रा. बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले) : १२व्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांचे विचार घरा-घरात पोहोचावे म्हणून मी समग्र महात्मा बसवेश्वर या महाग्रंथाची निर्मिती केली असल्याचे मत लिंगायत महासंघाचे प्रांतांध्यक्ष,तथा ग्रंथाचे लेखक प्रा. सुदर्शनराव बिरादार यांनी लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने हावगीस्वमी मठात आयोजित ग्रंथ वितरण सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
समग्र महात्मा बसवेश्वर या महाग्रंथाच्या १०८ प्रतीचे वितरण हावगीस्वामी मठात शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करुन वाचकांना देण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना प्रा. सुदर्शन बिरादार पुढे म्हणाले की, आम्हाला महात्मा बसवेश्वरांचे चित्र माहिती झाले पण त्याचे चरित्र माहिती झाले नाही.९० कि मी वर बसवकल्याण आहे.तेथे राज्य करुन जगाला मार्गदर्शन व्हावे, असे कार्य केलेल्या महात्मा बसवेश्वरांचे विचार महाराष्ट्रात यायला ९०० वर्षे लागले.याला धर्मगुरू व राज्यकर्ते जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कन्नड भाषेत महात्मा बसवेश्वरांचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण मराठी भाषेत म्हणावे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्यामुळे मराठी भाषिक अनुयायांना महात्मा बसवेश्वर कळायला खुप वाट पहावी लागली.आता मात्र मराठी भाषेतील अनेक लेखक साहित्य निर्मिती करीत आहेत. समाजातील तरुणांना आवाहन करतो की, त्यांनीच आता आपली जबाबदारी समजून आपणच महात्मा बसवेश्वरांचे विचार अभ्यासुन ते जगाला सांगावेत.देशपातळीवर महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रचार व प्रसार करण्यासाठी दिल्ली येथे महात्मा बसवेश्वर मिशन ही संस्था असायला हवी.आज महाराष्ट्र सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांचे स्वागत केले.व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.ही घोषणा बोलाचाच भात असे होऊ नये, ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी ग्रंथाचे व लेखकाचे कौतुक केले.प्रा तानाजी सोनटक्के, सुभाष बिरादार, डॉ अंजुम कादरी, अँड एस टी पाटील, मल्लिकार्जुन करडखेलकर,धनंजय गुडसुरकर, नामदेव कदम,प्रा एम बी पठाण आदींची महत्वपूर्ण भाषणे झाली. यावेळी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, सतिश उस्तुरे,विजय स्वामी, प्रभुराज कप्पीकेरे, भिमराव शेळके, महेश धोंडीहिप्परगेकर, अशोक तोंडारे, प्रा काळगापुरे, बापुराव शेटकार, अमरनाथ मुळे, शांतवीर मुळे, महादेव हरकरे, भरत करेप्पा,निलेश हिप्पळगे,शिवराज रंडाळे, बसवराज ब्याळे प्रा व्ही एस हुडगे,धीरज माकणे, संजय शिवशेट्टे, शिवराज तोंडारे, यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बसवराज ब्याळे व बापुराव पटणे यांनी लिंगायत महासंघात प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष शंकरे, यांनी केले तर सुत्रसंचलन शिवसांब स्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश धोंडिहिप्परगेकर यांनी मानले.