आयुवर्धन फिटनेस सेंटर तर्फे रक्तदान करून महिला दिन साजरा

आयुवर्धन फिटनेस सेंटर तर्फे रक्तदान करून महिला दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शुभांगी वट्टमवार संचालित आयुवर्धन फिटनेस सेंटर तर्फे महिला दिन साजरा करताना महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन मोफत रक्त तपासणी,रोग निदान शिबिर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. गेली तीन वर्षे पासून आयुवर्धन फिटनेस सेंटर उदगीरच्या माध्यमातून शुभांगी वट्टमवार या महिलांच्या आरोग्य चळवळीत एक मोठा बदल घडवून आणण्याचे कार्य करत आहेत. महिला या आपल्या कुटुंबासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत वेळ देत असताना, आपले आरोग्य सांभाळण्यासाठी वेळ निघणे तर दूर त्याचा विचार ही करायला त्यांना वेळ मिळत नाही.त्या साठी या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून या महिला आता आपल्या आरोग्याबाबत सजग होताना दिसत आहेत. आपली काळजी घेणे व आनंदी राहणे हा त्यांचा आता स्वभाव बनला आहे.

महिलांच्या आरोग्याची काळजी म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आहे. आणि म्हणूनच हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे शुभांगी वट्टमवार यांनी सांगितले.या वेळी एकूण 100 पेक्षा जास्त महिलांची मोफत रक्त तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. सोबतच 22 रक्तदात्यांनी रक्तदान करून हा महिला दिवस साजरा केला.या आरोग्य तपासणी साठी डॉ शितल जाधव, डॉ तृप्ती दाचावार,डॉ पूनम कल्याने, डॉ वर्षा सिद्धेश्वरे यांनी आपली सेवा दिली. सोबतच ओम साई क्लिनिकल लॅब उदगीर च्या वतीने अर्जुन गंगापुरे, दत्ता वासरे यांच्या वतीने मोफत रक्त तपासणी करण्यात आली. या रक्तदान शिबिर मध्ये दत्तात्रय वट्टमवार,डॉ उमेश लहाने,शरद स्वामी,अमोल पागे,नागेश काळगापुरे,योगिता साखरे, डॉ आफरीन शेख,मायादेवी बिरादार,उन्नती मोरलवार,स्नेहा गुणाले, लावण्या वट्टमवार, अनिता करडे, अनुराधा महाजन, स्मिता वट्टमवार, संयुक्ता बोडके, पूजा भोसले, शगुफ्ता हाश्मी, इफत सिद्दिकी,फराह सिद्दिकी, शेख इरफाना, भाग्यश्री निडवंचे,शुभांगी वट्टमवार यांनी रक्तदान करत महिला दिवस साजरे केला. यावेळी नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरचे पी आर ओ ओमकार गांजुरे, सचिन कोनाळे, सपना कांबळे, विनायक टकटवळे, संगमेश स्वामी उपस्थित होते. या सर्व शिबिरांसाठी आयूवर्धन फिटनेस सेंटर उदगीरच्या संचालिका शुभांगी वट्टमवार, भाग्यश्री निडवंचे,पूजा भोसले, अनिता करडे, श्वेतांबरी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

About The Author