स्वारातीम विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांची बिनविरोध निवड

स्वारातीम विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांची बिनविरोध निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतर्गत संगणकशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांना अठ्ठावीस वर्षाचा शैक्षणिक तसेच प्रशासकीय कार्याचा अनुभव आहे. त्यांना मागील चौदा वर्षा पासूनचा संशोधन कार्याचा देखील अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी प्राप्त केली आहे. तर एका विद्यार्थीनीने एम.फील ही पदवी मिळवली आहे. आजघडीला प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पीएच.डी पदवी चे कार्य करीत आहेत. यासोबतच डॉ. जगताप यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका लघु शोध प्रबंधावर देखील कार्य पूर्ण केले आहे. आत्तापर्यंत त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित झाले असून त्यांचे विविध प्रादेशिक,राष्ट्रीय-परराष्ट्रीय चर्चासत्रे, सेमिनार, कार्यशाळा,संशोधन मासिके मध्ये बेचाळीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ज्यात राज्यस्तरीय पाच, राष्ट्रीय स्तरावर चार, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाच तर विविध संशोधन मासिकामध्ये अठ्ठावीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया,चीन, दुबई,इंग्लड, थायलंड, कंबोडिया, फिनलंड, फ्रांस, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, मलेशिया, नॉर्वे, स्कॉटलंड, साऊथ कोरिया,सिंगापूर, स्वीडन, व्हिएतनाम इ.देशात जाऊन शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन परिषदेचे सत्र प्रमुख म्हणून पण त्यांनी कार्य पाहिले आहे. प्राचार्य डॉ. सुधीर जगताप हे कॉम्पुटर सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सायन्स काँग्रेस, विवेकानंद ट्रस्ट कन्याकुमारी या संस्थेचे आजीवन सभासद आहेत. तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियरर्स हॉंगकॉंग, कॉम्पुटर सायन्स टिचर असोसिएशन यूएसए, इंटरनेट सोसायटी स्वित्झर्लंड, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी सिंगापूर आदी परदेशातील प्रतिष्ठित व्यावसायिक मंडळाचे सदस्य आहेत.

प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी पाच राष्ट्रीय परिषद, सात कार्यशाळा, दोन सेमिनार, तर पाच ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तर तीन राष्ट्रीय परिषेदेमध्ये संपादक म्हणून कार्य केले आहे. यासोबतच प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य,विद्या परिषेदेचे सदस्य (दोन वेळा), संगणकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे दोन वेळेस अध्यक्ष,आर.आर.सी समितीचे सदस्य या पदावर देखील कार्य केले आहे. प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर या कॉलेजला उत्कृष्ट राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनाचा पुरस्कार 2017 मध्ये मिळाला. तर सयाद्री उद्योगच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सयाद्री शिक्षण रत्न पुरस्कार-2017 अहमदनगर,वंदे मातरम प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने शिक्षण रत्न पुरस्कार 2019,रंगकर्मी साहित्य कला केंद्र प्रतिष्ठान उदगीर यांच्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक कार्या करीता 2022 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या निवडीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्राचार्य तथा माजी प्र-कुलगुरु डॉ.जी.एन.शिंदे, डॉ. एम.आर पाटील, प्राचार्य डॉ. ए.बी थोरात, प्रा.डॉ.जोगदंड, डॉ. डि.एन. मोरे,शैक्षणीक संचालक डॉ.उमाकांत पाटील,उपप्राचार्य डॉ. धनंजय गौड, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकरी प्रा. अमर तांदळे, प्राचार्य गणेश तोलसरवाड, प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, प्राचार्य ज्योती तारे, प्राचार्य नागसेन तारे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.एस.एल. जाधव, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, जय-हिंद पब्लिक स्कूल चे शैक्षणिक संचालक संजय हट्टे, ज्योती स्वामी, प्रा. नयन भालेराव, प्रा.असिफ दायमी, प्रा. हणमंत सूर्यवंशी, श्री. महेश हुलसुरे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. ऋतुजा डिग्रसकर,प्रा. शुभांगी शिंदे,प्रा.आकाश कांबळे, वैष्णवी चित्ते, वैष्णवी गुंडरे, अमोल भातकुले, अपर्णा काळे, यांनी अभिनंदन केले.

About The Author