क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनंजय गोंड,शैक्षणिक संचालक डॉ. उमाकांत पाटील,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे,परीक्षा विभागाचे प्रमुख एस.एन.जाधव, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. नयन भालेराव, ,प्रा. आकाश कांबळे,प्रा. राशिद दायमी,प्रतीक फुले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. धनंजय गोंड यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने पहिली मुलीची शाळा पुणे येथे सुरू केली. त्यांना हे कार्य करीत असतांना समाजातून प्रचंड विरोध स्वीकारावा लागला.त्यांच्यावर शेण आणि कचरा फेकून अपमानित करण्यात आले, परंतु या विरोधाला न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपले कार्य करणे चालूच ठेऊन आदर्श निर्माण केला.विरोध मोडीत काढत त्या अधिक जोमाने कार्य करीत राहिल्या.आज महिला शिकून प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत, त्या फक्त सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेचं. त्यामुळे प्रत्येक मुलीनी आपला आदर्श म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्याचा अभ्यास करावा, असे ही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. राहुल पुंडगे यांनी केले तर आभार प्रा. अमर तांदळे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.ऋतुजा दिग्रसकार, प्रा. शिंदे मॅडम, प्रा असिफ दायमी, प्रा. हणमंत सूर्यवंशी, वैष्णवी चित्ते, वैष्णवी गुंडरे, राज पवार, शेख असिफ, आयन गुत्ते, बालाजी आवळकोंडे, योगेश जगताप, रोहन कांबळे, साईनाथ केदासे, प्रबुद्ध फिरंगे,अपर्णा काळे,अमोल भाटकुळे यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.