प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे आज आकाशवाणी परभणी केंद्रावर भाषण

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे आज आकाशवाणी परभणी केंद्रावर भाषण

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार, ललित लेखक व समीक्षक आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर चे प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांचे आकाशवाणी परभणी केंद्रावर भाषणाचे प्रसारण रविवारी दि. ११ एप्रिल २१ होणार आहे.
दि. ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती च्या अनुषंगाने थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी दिलेली माहिती आकाशवाणी परभणी केंद्रावर दि. ११ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा (१०.३०) वाजता रविवारी प्रसारित होईल. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सतीश जोशी व आकाशवाणी निवेदक आनंद पोहनेरकर यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!