मूळारंभ कादंबरी

लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर ……..

संवेदनशील मनाने
स्रीअंतरंगातील जपलेल्या भावना ,संगीतप्रेमी ,भावहृदयस्थ भाव निर्मिती करणारा लेखक ,
अंतरंगतले गुज ओळखणारा लेखक ‘आशुतोष जावडेकर ‘!!!
‘मुळारंभ’ कांदबरी वाचताना भावना दाटून येतात……….भावनांचे अलगद पडसाद उमटवणारा ,मनातला
मनमोकळा सवांद ,निसर्गाचे वेड,प्रेम लावणारा हा लेखक !!!
सहिष्णुता ,औदार्य ,एक सच्चा भाव मनातला ‘मुळारंभ ‘ वाचताना जागृत होतो.
“भुता परस्परे पडो मैत्र जीवांचे “l
ही ज्ञानेश्वरीची ओळ इथे आवर्जून आठवते .
मुळारंभ कादंबरीतील नायक
भोळा निरागस ‘ओम ‘ ज्याला
भाव मैत्रीची तीव्र ,ओढ असते. मनाच्या बालिशतेचे ओहोळ प्रसंगी वाचताना अल्लड लहरी मंद गतीत मनास स्पर्शून जातात …………
डेंटल कॉलेजातील गमती जमती, आभाळमोकळ्या मित्रमैत्रिणीच्या गप्पा , जाणिवेच्या मर्यादा न ओलांडता ,तारुण्याच्या मस्तीत प्रेमाचे रंग ,इंद्रधनू फुलवतात कधी अभ्यासाची कसरत,गदरिंगची चढाओढ,……… कनक,जिंदिया,पूनम,मनदीप,गीता मैत्रीचा भन्नाट जोश !!!पण त्या मैत्रीतले वेगळेपण ,जीवाचे बंध जोडणारा ओम !!!!वेगळ्याच थाटातला !!!ओमच्या निर्विवाद सत्याची ठोस सबुत जाणिवेच्या रहस्याचा उलगडा,अंतरकोष,मनाचे विविध कोष , असा वेगळेपण जपणारा बालिश ओम !!!!
जीवनातील मार्मिक बंध जपणारा अन हसता रडता दिलखुलास व्यक्तिमत्व ‘ मुळारंभ’ जणू आयुष्याची आद्य सुरवात !!!!
कादंबरी वाचताना सुरवातीस फक्त डेंटल कॉलेजातील हास्य विनोद गप्पा
एक मित्र मैत्रिणीचा कट्टा असे न राहता ही कादंबरी मनाचा सूक्ष्म वेध घेते .कौटुंबिक जिव्हाळा मानसिक आंदोलने वेचताना वाचक भावनाविवश होतो .
लेखकाने नायक ओम आणि त्याच्या आईच्या संवादातून मातृत्ववात्सल्याची नाळ ,संस्काराचा ओलावा ,स्पर्श!!! वाचताना श्यामच्या आईचा श्याम व आईच्या संवादातील ‘सानेगुरुजी’ प्रकर्षाने आठवतात …………
कॉलेजमध्ये कुठल्याही व्यसनाची ओढ असते मात्र त्यातून होणारे शारीरिक नुकसान लेखकाने स्पष्ट केले ……….कॅन्सरने दगवणारा मित्र ,त्यामुळे विवेक जागृती होते.
ह्या दोस्तमंडळीची अभ्यासाची सवय, परीक्षेसाठी घेतले जाणारेअथक प्रयत्न त्यामुळे पुस्तक वाचताना आपोआपच जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठीचा आत्मविश्वास तरुणांना नक्कीच ह्यातून मिळतो .
सृजनशील लेखकाने आईच्या अंतरंगाचा ,स्त्रीमनाचा ठाव घेतला आहे .
ओमची आई ‘वसू ‘तिची आई येणार म्हटले तरी डोळ्यात पाणी येतं आणि आई जाणार म्हटलं तरी पाणी येत “
“ते पाणी आईसाठीही असते आणि स्वतःच्या हरवून गेलेल्या बालपनासाठीही “…………
ह्या ओळी अत्यंत सृजन हृदयाने टिपाव्यात तशा त्या वाचताना काळजात अलगद उतरतात .
‘मुळारंभ’ ह्या कादंबरीत संगीताचा सूर ,उद्देशीत काव्य ,निसर्ग ओघवतेच अलगद मांडले आहेत जीवनातली लयबद्धता ………
ही वाट दूर जाते
स्वप्नामधील गावा ……… ‘जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा’
ह्यातली भावदर्शीता मनास व्यापते .
तारुण्याची हुरहूर ……….
“डोळ्यांतील चांदणे पिऊन घ्यायला डोळे अधीर होतात “
ह्या ओळी….. कॉलेज ,मित्राची ओढ….. “घरी येताना शरीर पोचत मन घरात येत नसत पण जाताना शरीराआधीच मन जाऊन कॉलेजात पोचते “…………..
तारुण्यातली ही यौवन छटा ,तर
जीवनातली मार्मिकता दाखवताना भावनांचा आकस तर कधी हास्य रस ………..
लेखकाने एका प्रसंगी असे म्हटले ,”
“आपण होणार डेंटिस्ट …
माणसं एक ते पाच मिनिटच दिवसातून दाताकडे लक्ष देतात ब्रश करेस्तोर !!”
‘आपण त्यांच्यासाठी पाच वर्षे घालवायची ‘????अजून एका प्रसंगी लेखक म्हणतो ,
“अनटॉमीचे मसल्स पाठ करून डोळ्यांचे मसल्स थकलेत”
हा मोठा प्रश्न सहजच विनोदीभाव आणतो .
मनातल्या विविध भावनांचे तरंग मैत्री…. दोस्त मित्रमैत्रिणीमुळे होतात त्यासाठीचा ‘ओमचा ‘कृतज्ञभाव मनाला स्पर्शून जातो .
अभ्यास करताना अभ्यासाची खोली म्हणजे शिवालायचे भव्य रूप !!!प्रचंड अभ्यासाचा व्यासंग दर्शवतो ……
परीक्षा ,पेपर सोडवतानाची मित्राची मज्जा , टेबलाखाली ओमची स्वतःस तपासणी प्रामाणिक व सामान्य, असामान्य ओम दोन्ही बाजूची पारदर्शकता मनास स्पर्शून जाते .!!!
“तारुण्यातील मोलाचे क्षण नीट न्याहाळले तर आयुष्याला वेगळी समज येते पण तेहवा ते कळतच नाहीत ……जेहवा कळले तेहवा आपण तरुण नसतो ” ही दुरदृष्टीता ,समज लेखकाने त्या वयात सांगितली ह्यावरून जीवन जगण्याची कला नकळतच आपल्याला जीवनानंद घेण्यासाठी उरावे असे मनोमन वाटते ………
लेखकाचे ओमचेअचानक मित्रांसोबत त्यांच्या गावी जाणे ,तिथे अस्वस्थ मनाने केलेली आईची आठवण आईला लिहलेली पत्रे, कृतज्ञ भाव त्याच्या हृदयातील आईबद्धलचा मित्रभाव ,प्रेम ,भावनिक संवाद मनातला कोपरा कोपरा उजळून भारावून टाकतो .मायेची ऊब देऊन जातो…….ओमच्या तारुण्य अवस्थेत बालपणीच्या संस्काराची घट्ट चौकट जाणवते !!
दिवाळीत ओमला पडलेला प्रश्न,अनुत्तरित …. रामलक्ष्मण कोणाचे ?
अध्यात्मातली ओढ व चौकस प्रश्न वाचकांना हेलावून सोडतात..
शृंगार रसातल्या कवितेच्या ओळी
मातीमध्ये उगवूनसुद्धा, आभाळपर्यंत पोहोचलेले !!
इंदिरा संत यांच्या अप्रतिम ओळीं
कळ्या माझ्या आनंदाच्या ….
साठविल्या माझ्याकडे
फुलवाया तुझ्याकडे …..
तारुण्यातील कोवळं अन खऱ्या प्रेमाच्या भावकळ्या अंतरंगात जणू फुलाया लागतात …….
आईबाबसाठीच प्रेम ,आईबाबाच्या नोकरीबदलीने होणारी अस्वस्थता, नकारात्मक गोष्टीनाही लेखकाने सकारात्मकतेचा घेतलेला स्वभावदर्श आवडतो .
आईच्या जीवनातील दुःखाची गडद लाट लेखक आईच्या कष्टसोस्वच्या जाणिवा देऊन जातो .
एवढेच नाही तर ,
छंद व्यक्तीला खऱ्या अर्थाने जगण्यास शिकवतात ओमच्या आवडीचे खेळ ,अन निसर्गाची आवड ,गाणं ,त्याच्यातील व्यक्तिमत्वाचे निरागस पैलू मनालाआल्हाद सुख देतात .
कॉलेजातील गँदरिंगमध्ये गाण्यासाठीची मित्राला दिलेली साद , मनाचा मोठेपणा , असूयाविरहित ओम इथे वाचकांना मनातली स्पदने,प्रांजळ मैत्री …. खूप काही देऊन जाते .
.आजारी मित्राला केलेली प्रासंगिक काळजी ,सेवाभाव ,ऋजुता !!!ओमने जोपासलेली निःस्वार्थ मैत्री ,
सद्सद्विवेकाने क्रोधावर केलेली मात,
कनकला सोडून जाताना मुसळधार अश्रूंची धार वाचकांना भावविवश करते.!!!
नात्यातील बदल ,निसर्गातील अढळ बदल सांगताना ओम च्या स्वगत ओळी जीवन जगण्यास आत्मबळ देतात
“बदल हा अपरिहार्य असतो
.एक तर जग तुम्हाला बदलवत
*
तुम्ही ताकदीचे असाल तर तुम्ही


जगाला बदलवता


ह्या ओळी जगण्यास उत्साह ही देतात !
मृत्यूही कुठे शाश्वत असतो?? हा गंभीर प्रश्न मनाभोवती सतत घिरट्या घालतो .
अन प्रॅक्टिकलच्या वेळी शाश्वत मृत्यूची अनुभूती एक सत्य !!!सोबतच रोहीणीआजीने सांगितलेली देहदानाची मोठी कल्पना सहजच लेखक मांडून जातो ……..
निसर्गात रमलेला ओम ; सूर्य
मावळतानाही ,
विझतानाही चमकणारा केशरी रंग बलशाली मारुतीची आठवण करून देताना ओमने केलेली मतिमंद मुलांसाठी मारुतीरायला मागितलेली शक्ती,आर्त प्रार्थना डोळे भरून पाणी आल्याशिवाय राहत नाही .
मनापासून पुस्तक वाचल्याने कृतकृत्य झाल्याची भावना भावनेला खिळून ठेवते .!!!!!
ओमने एकांतात घेतलेला स्वतःचा आढावा ,जीवनातल्या वास्तवतेचा ,सच्चा मनाचा शोध , सच्चा मित्राचा शोध, अनपेक्षित भेटलेला मित्र सिद्धार्थ ,त्याच्याशी झालेली गैर कसरत ,बौद्धिक लढाई ,
आईने सांगितलेले ब्रीदवाक्य ,”स्वतःस व दुसऱ्यास ही माफ करणे”
ह्या गोष्टी मनात घर करून राहतात .असामान्य मनाचा दर्जा वाचकांच्या मनातला कोतेपना घालवतो ……
प्रेयसी व आई ह्यांच्यातली साम्यता वैशिष्ट्य ,आजीविषयीचे ओमचे प्रेम
आजीसोबतचा मनमोकळा भावनिक सवांद ,मैत्री ,आजी आजारी असताना तिच्यासाठी रडणारा ओम ,ओमचे चिंब हृदय ,व आईसाठी काळीजवाहूप्रेम , प्रसंगी कर्तेपणा,मनाला करुण रसात चिंब वाहवितात.
शेवटी उत्तराधार्त , आकाशातील हलकेच येऊ पाहणाऱ्या खुळ्या चांदण्या जीवनातील सहचारिनीची ओढ ,……..शृंगाररसस्पर्श ,ओमला आवडणारे पारंपरिक सण चैत्र गौरी हळदीकुंकू ,मनदिपचे घरी न येणे ,आनंद ,दुःख राग ,मोह माया असे
जीवनातील खरेखुरें भावसत्य ….
.जीवन प्रवासात माणसं भेटत जातात ,निसटतात ,……
वर्तमानातील क्षण पुन्हा गवसतात , हरवतात …….
रंगपंचमीच्या विविध रंगाची विविध छटा जीवनातील रंग ,शाश्वत काही बदलते अन कधी ही भेटणारी
माणसं !!!आपली कधी दूरची पण त्या नात्यातली गुंफण रेशमी !!
“मागचे धागे तुटत जातात
नवे धागे विणले जातात.”…… अन आठवणींची ही विविध रंगशिंपले आयुष्याला नेहमीच रंगवणारी स्पंदवणारी …….
ओमच्या श्वासात मिसळणारी सखी मनदीप ….!!!!!
आयुष्याला उजाळा देणारी एक दीर्घ आठवणींची प्रफुल्ल आठवशिल्प वाचताना …….
आयुष्यातला मुळारंभ कधीही कुठेही ,केव्हाही आयुष्याचा घाट चढ उतरणं ……….सांभाळत
मनाला तोष देणारा ……..!!!!
नक्कीच !!!
लेखिका
सुरेखा गुजलवार
उदगीर

About The Author