1486 कोरोनाबाधित रुग्ण; 7 रुग्णांचा मृत्यु
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 31992 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1486 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 7 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 2093 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 557 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 4200 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 929 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या42000 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 9204 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 804 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31992 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 582 आहे. आरटिपीसीआर मधील 1740 अहवाल प्रलंबित आहेत.