महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्य शिक्षिका, मुख्याध्यापक, महान कवयत्री व थोर समाज क्रांतिकारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर उपस्थित सर्व प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी यांनीही सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी डॉ सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, प्रा. अतिश आकडे, डॉ. डी.एन. माने, डॉ. सचिन गर्जे, प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author