आ. बनसोडे यांच्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात विकास पोहोचला – उपसरपंच बंडे

आ. बनसोडे यांच्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात विकास पोहोचला - उपसरपंच बंडे

चिमाचीवाडी (एल.पी.उगिले) : उदगीर तालुक्यातील एक छोटेसे गाव मात्र शासनाच्या विविध योजनांची पूर्तता करणारे आणि विकासासाठी सदैव तत्पर असलेले आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमाचीवाडी या गावच्या विकासासाठी देखील विकास महर्षी माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी बनसोडे यांनी विकास निधी दिला आहे. इतकेच नाही तर मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, तांडा वस्ती या ठिकाणी सुविधा पुरवण्याचा चंग बांधला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघाचा वर्षानुवर्षांपासून शिल्लक राहिलेला बॅकलॉग पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न चालवला आहे. असे विचार चिमाचीवाडी येथील उपसरपंच प्रशांत बंडे यांनी व्यक्त केले. ते चिमाचीवाडी येथे सामाजिक न्याय विभागामार्फत आ. संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक सभागृह उभारण्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना बंडे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासून विकासाला हापापलेल्या अनेक गावांचा विकास करणे बाकी आहे, असे असतानाही आ. संजय बनसोडे हे सर्व समावेशक पद्धतीने विकासाचा आराखडा राबवत आहेत. आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावा. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ते विकास निधी खेचून आणत आहेत.त्यांनी विकासाची गती चांगलीच पकडली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक विकास निधी खेचून आणणारा कर्तबगार आमदार म्हणून नवी ओळख त्यांनी निर्माण केली आहे, असेही सांगितले. याप्रसंगी सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पंढरी दुर्गावाड आणि उपसरपंच प्रशांत बंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author