बिरादार परिवार कडून श्री एकनाथ षष्टी चे आयोजन
वाढवणा (प्रतिनिधी) : शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज यांच्या एकनाथ षष्टी निमित्त बिरादार परिवार कडून दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त भजन, पूजन,किर्तन,बैठकी भजन,गवळणी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा परिसरातील भक्तांनी लाभ घेण्याचे अवाहन जेष्ठ विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांनी केले आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील बिरादार परिवार कडून दर वर्षी एकनाथ षष्टी निमित्त दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.याहि वर्षी एकनाथ षष्टी निमीत्त रविवारी रात्री ९ ते १२ ह.भ.प.गणेश महाराज किनीकर यांचे किर्तन होणार आहे.रात्री १२ ते ४ पर्यंत बैठकी भजन,गवळणी व भारुडाचा कार्यक्रम तसेच सोमवारी सकाळी ९ ते १२ ह.भ.प.नामदेव महाराज उमरगेकर यांचे गुलालाचे किर्तन होणार आहे.या किर्तना नंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे .याचा भाविकांनी लाभ घेण्याचे अवाहन प्रा.प्रविण बिरादार,विधीज्ञ प्रमोद बिरादार,प्रशांत बिरादार,पुष्पलता जाधव,प्रा.प्रतिभा कोडग्याळे,श्रेयश बिरादार यांनी केले आहे.