बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र काढुन फसवणूक,गुन्हा दखल

बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र काढुन फसवणूक,गुन्हा दखल

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरात आणि लगतच्या भागात प्लॉटिंग चे भाव चांगलेच वाढल्यामुळे बोगस कागदपत्र तयार करून परस्पर विक्री करणारी टोळी उदगीर शहरात सक्रिय झाली आहे. गंमत म्हणजे बाबा खतीब यांच्या तक्रारीवरून यापूर्वी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्यातील काही संशयित आरोपींना तत्कालीन पोलिसांनी वगळल्यामुळे अशा पद्धतीचे गुन्हे करण्याची हिम्मत वाढीस लागली आहे. विशेष बाब म्हणजे मयत व्यक्तीला जिवंत दाखवून त्या व्यक्तीची संपत्ती परस्पर तिसऱ्या व्यक्तीच्या नावावर करणारे आणि एक दोन नव्हे तर तब्बल सहा सात वेळा त्याच प्लॉटची विक्री करणारे आरोपी असल्याने अशा प्रकारचे अनेक प्रकार घडले असावेत अशी चर्चा शहरात चालू असतानाच आणखी एका प्रकरणाने या चर्चेला उधाण आणले आहेत.

प्लॉटचे मंजूर रेखांकन व अकृषी परवाना नसल्याने खरेदीखत करता येत नसल्याने त्यासाठी गुंठेवारी करणे आवश्यक आहे. म्हणून नगरपालिकेचे कामे करतो असे सांगुन नगरपालिका कार्यालयातून गुंठेवारी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे घेऊन बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र काढून दिल्या प्रकरणी शहरातील एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी शिवकुमार पांडे (रा.तोंडार), ताजोद्दीन शेख (रा. कमरोद्दिनपूर ता.देवणी) व धनराज पाटील (रा. रावणकोळा, ता. मुखेड) हे संयुक्त मालक असलेल्या उदगीर येथील जमीन सर्वे नंबर २२१/३ प्लॉट क्रमांक ३८ चे मंजूर रेखांकनानुसार अकृषी नसल्यामुळे गुंठेवारी परवाना काढण्यासाठी नगरपालिकेला जात येत असताना तिथेच दलाल म्हणून काम करणारा अतिक लाईक शेख (रा.हावगीस्वामी चौक, उदगीर) हा पालिकेत प्लॉटची नामांतर गुंठेवारी प्रमाणपत्र बांधकाम परवाना काढून देत असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही त्यास मार्च २०२० मध्ये भेटून गुंठेवारी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यानंतर सदर आरोपीताने तीस हजार रुपयाची मागणी केली, बैठकी अंती सत्तावीस हजार रुपये मध्ये पालिकेतून गुंडेवाडी प्रमाणपत्र काढून देण्याचे ठरले. त्यानुसार सदर आरोपीने १७ मे २०२० रोजी गुंठेवारी प्रमाणपत्र क्रमांक जी १५७८ आणून दिले. त्यानुसार सदरील क्रमांकाचा प्लॉट या गुंठेवारी प्रमाणपत्राच्या आधारे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी काशीराम रामराव राठोड यांना येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदीखत करून देण्यात आला. त्यानंतर १७ डिसेंबर २०२१ रोजी फिर्यादीच्या असे लक्षात आले की, आतीख शेख याच्यावर बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर फिर्यादीस काढून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची फिर्यादी यांनी नगरपालिकेत जाऊन पडताळणी केली असता, सदरील क्रमांकाचे गुंठेवारी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळुन आले. त्यानुसार प्लॉट मालकाच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसठाण्यात रात्री सदर आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!