औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतर थांबवा – ॲड.मुहम्मदअली शेख

औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतर थांबवा - ॲड.मुहम्मदअली शेख

लातूर (एल.पी.उगीले) : राज्यातच नव्हे तर देशभरात अनेक गंभिर प्रश्न असताना सरकार मात्र हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे मुस्लिम धर्मियांच्या अस्मितेचे नव्हे तर अखंड भारताचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक शहरांची नावं बदलण्याचा धडाका सरकारनं सुरू केलाय. याचाच एक भाग म्हणजे नुकतेच राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलली आहेत. जे कायदेशीर नाहीत.त्यामुळे आता यात महामहीम राष्ट्रपतींनी लक्ष घालून हे नामांतर थांबवावे, अशी मागणी एम आय एम चे जिल्हाध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी त्यांच्यासोबत मौलाना अख़िल मोमिन सहाब, एमआयएम शहर उपाध्यक्ष शेख सत्तार, अहमदखान पठान, शेख ताहेर, यासिनख़ान पठान उर्फ़ शेरा, शाकेर क़ुरेशी, सय्यद ज़ियाउद्दीन, मोमिन मुसा, अकबर पठान, शेख अफ़रोज़, शेख सद्दाम, रिज़वान ख़ान अब्दुर्रहमान मोमिन आदींची उपस्थिती होती.

About The Author