व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्त होऊन जगा – प्रा. डॉ.सय्यद अकबर लाला
अहमदपूर (गोविंद काळे) : नैतिकता, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, सामाजिक दायित्वाची भावना आजच्या माणसांमध्ये दिसत नाही, केवळ पुस्तकी ज्ञानाने माणूस घडत नाही तर; आपल्या संस्कृती आणि संस्कारातून माणूस घडतो. त्यामुळे व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुसंस्कृतपणे व्यक्त होऊन जगा असे परखड मत ख्वाजा नसिरोद्दिन कॉलेज शिराढोण जि. धाराशिव येथील सुप्रसिद्ध हास्य व्यंग कवी प्रा. डॉ. सय्यद अकबर लाला यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे ‘वार्षिक स्नेहसंमेलन २०२३’ च्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर महाराष्ट्रातील ख्यातनाम ललित लेखक तथा मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तसेच, उद्घाटक म्हणून खाजा नसिरोद्दिन कॉलेज शिराढोण जिल्हा धाराशिव येथील डॉ. सय्यद अकबर लाला यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक तथा सुप्रसिद्ध विद्रोही कवी डॉ. मारोती कसाब तसेच भूगोल विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध ग्रामीण कवी डॉ. दिगंबर माने यांची उपस्थिती होती. यांच्यासह उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, स्नेहसंमेलनाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. सय्यद अकबर लाला यांनी हिंदी, मराठी काव्यातून माणुसकीचा परिचय करून दिला. तसेच माणूस म्हणून कसे जगावे हा मूलमंत्र त्यांनी काव्यातून प्रस्तुत केला. ते म्हणाले की, ‘इश्क ईक ऐसी बिमारी है, बच्चों को छुती नहीं, बुढों को पकडती नहीं, और नवजवानों को छोडती नहीं ‘ असे म्हणून इश्क एक जान लेवा बिमारी है. हा संदेश तरुणांना देते वेळेस आई-वडिलांची सेवा करा देव इतर कुठे ही नाही, तो आई- वडिलांमध्ये आहे.असे ही ते म्हणाले.
तसेच त्यांनी वडिलां वर ‘माझा रागोबा ‘ हे मराठी काव्य गीत सादर करताना म्हणाले की,
‘मला जन्म देणारा माझा बाप
निघून गेला रं,
एका क्षणात माझा राघू निघून
गेलात गेला रं,
आता माझ्या राघूची फक्त
आठवण येईल’
ही आई वरील कविता सादर केली.तर पुढे ते ‘मॉ’ कवितेच्या माध्यमातून म्हणाले की,
‘ऊपर जिसका अंत नही,
उसे असमान कहते है I
जिसकी ममता का अंत नही,
उसे माँ कहते है I’
असे म्हणून त्यांनी आईची महिमा गायली. याबरोबरच जीवनाच वास्तव चित्रण करणाऱ्या कविताही त्यांनी सादर केल्या भ्रष्टाचार, दल बदलूपणा आदी कवितेतून आजच वास्तव त्यांनी तरुणाई समोर मांडलं. त्याचबरोबर आजच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. मारोती कसाब यांनी कविता माणसाला जगणं कसं शिकविते ? यावर आधारित वास्तववादी कविता सादर केल्या. तसेच, ग्रामीण कवी डॉ. दिगंबर माने यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला आपल्या कवितेच्या माध्यमातून दिला. या संमेलनाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी उपस्थित कवींच्या भावनांचा गुणगौरव करून स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्नेहसंमेलन संयोजक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी करून दिला व सूत्रसंचालन मराठी विभागाचे ज्येष्ठ प्रोफेसर तथा ह भ प डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर, आभार हिंदी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले . यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.