छात्रअध्यापंकानी विविध शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करावीत – राहुल केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील गोविंदराव पाटील अध्यापक महाविद्यालयाचे सरावपाठ व आंतरवासिता शिबिर पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यालय उदगीर येथे संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे म्हणाले की, छात्रअध्यापंकानी अध्यापना सोबततच विविध शैक्षणिक कौशल्य व तंत्रज्ञान अवगत करावे. त्या मुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस मदत होईल. या प्रसंगी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य स्वामी एस.बी., मुख्याध्यापिका सुजाता निडवदे, संस्थापक अमोल निडवदे, नगरसेवक गणेश गायकवाड, चंद्रअण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, संस्थेचे कार्यवाहक शिवानंद होनमोडे व सर्व छात्रअध्यापक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंतरवासिता शिबिर प्रमुख कु. वैष्णवी डोंगरे तर पर्यवेक्षक म्हणुण सूरज गरगटे यांनी काम पाहिले. यावेळी अध्यापक विद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, निबंध, रांगोळी स्पर्धा, लेखन स्पर्धा, व वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.