आर्य वैश्य महासभेचा कर्करोग जागृती अभियानात सहभाग
उदगीर (एल.पी.उगीले) :रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्करोग जनजागृती “वॉकेथान” उदगीर येथे घेण्यात आले. या अभियानात अनेक महिला संघटनाचा सहभाग होता. आर्य वैश्य महिलांनी देखील उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग ह्या अभियानात नोंदविला.आर्य वैश्य महासभेच्या अध्यक्षा सुजाताताई पंदिलवार,उपाध्यक्ष सुहासिनी सुरशेटवार, आरोग्य विभाग प्रमुख साहित्यिका सुरेखा गुजलवार यांनी”सशक्त स्त्री शक्तीचा एकच नारा,कॅन्सरला आता नाही थारा “अशा विविध घोष वाक्यांनी उदगीर परिसरात प्रबोधन केले. ह्याचा प्रतिसाद जोमाने देत डॉ संगीता कोटलवार, डॉ.तृप्ती दाचावार सहसचिव मनीषा पारसेवार, सहकोषाध्यक्ष सविता मोदी,सह प्रसिध्दी प्रमुख पल्लवी पोलावार,सांस्कृतिक प्रमुख सपना गादेवार, सामाजिक विभाग प्रमुख ज्योती चिद्रेवार, ज्योती वट्टमवार,अश्विनी पारसेवार,स्वाती देवशेटवार ,मंजुषा वट्टमवार,अर्चना पारसेवार, भाग्यश्री बोथीकर,संगीता पंदिलवार,अर्चना पेन्सलवार,दीपाली मोदी, तेजल पेन्सलवार तसेच शहर प्रमुख शुभांगी वट्टमवार,ज्योती चिद्रेवार,मनीषा पारसेवार सविता मोदी,पल्लवी पोलावार आदी आर्य वैश्य महिलांनी जोरदार सामाजिक प्रबोधन केले.” .महिलांनी मानसिक दृष्ट्या सक्षम, शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे हा या कर्करोग जन जागृतीचा एकमेव उद्देश साधत कर्क रोग जेवढा भयानक आहे, तेवढाच निदान झाल्यावर तो उपचाराने जीवनदान देवू शकतो. तळागाळापर्यंत ही जाणीव लोकांना व्हावी. ह्या आजाराची भीती न बाळगता महिलांनी कर्करोग तपासनीस पुढाकार घ्यावा. हाच ह्या वॉकेथानचा उद्देश होता .रोटरी क्लब अध्यक्ष रामेश्वर निटूरे ,सचिव व्यंकटराव कणसे , चेअरमन सोनटक्के महानंदाताई व रोटरी सदस्य देखील या अभियानात उपस्थित होते. वॉकेथान शाहू चौक उदगीर येथून सुरुवात झाले. महिलांनी अतिशय प्रसन्न व जोमाने कॅन्सर मुक्ती चे सामाजिक प्रबोधन केले. शिवाजी चौक रस्त्यावरील नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला. प्रचंड नागरिकांची गर्दी हा देखावा उत्सुकतेने पाहत होती. हुतात्मा स्मारक इथे ह्या वॉकेथानचा समारोप झाला. या समारोपात प्रजापिता ईश्वरी विश्व विद्यालयाच्या ब्रह्मकुमारी महानंदा बहेनजी ह्यांनी स्त्रीला संस्कृतीचे जतन करण्यास सांगितले, तर डॉ. प्राजक्ता गुरुडे यांनी कर्करोगाची माहिती दिली, सोनटक्के महानंदाताई यांनी सर्व संघटनेचे आभार मानले .सर्व संघटना स्त्री प्रमुखाचा सत्कार रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आला.इन्नरव्हील क्लब ,सखी सहेली मंच,वसुंधरा ग्रुप, जिजावू बिग्रेड, डॉ . असोसिएशन वुमेन्स फोरम, आयुर्वरधन फिटनेस सेंटर,ब्रह्मकुमारी ईश्ववरी विश्वविद्यालय ह्या सर्व स्त्रीशक्ती संघटना उपस्थित होत्या.