महिलांच्या सन्मानाचे सोहळे प्रत्येक दिवशी झाले पाहिजेत – प्राचार्या उषा कुलकर्णी
उदगीर (एल.पी.उगीले) : माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. महिलांचे हक्क, शिक्षण या बद्दल जागृती निर्माण करण्यासाठी जीवन अर्पण केले. स्त्री कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असते. देशाच्या प्रगतीमध्येही स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे. विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत. अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी होणारे महिलांंचे सन्मानाचे सोहळे केवळ एका दिवसापूर्ते मर्यादीत न राहता, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी सन्मान झालाच पाहिजे. असे मत प्राचार्या उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या मातृभूमी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलल होत्या. यावेळी अनूराधा वर्मा, प्रा. रुपाली कुलकर्णी, प्रा. रेखा रणक्षेत्रे, ग्रंथपाल उषा सताळकर, जगदिशा ओंकारे, यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना उषा कुलकर्णी म्हणाल्या की,महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनके यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो.महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो. या दिवसाला आंतराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी संस्थेचे संस्थापक आध्यक्ष सतीश उस्तुरे, प्रा. बिभिषण मद्देवाड, मातृभूमी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वंयसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.