ज्याच्या अंगी दया, क्षमा,शांती,त्यांना संत म्हणावे – ह.भ.प.गणेश महाराज किनीकर
वाढवणा (प्रतिनिधी) : ज्यांच्या अंगी दया,क्षमा,शांती हे तिन गुण आहेत अशा लोकांना संत म्हणावे असे प्रतिपादन ह.भ.प.गणेश महाराज किनीकर यांनी केले. ह.भ.प.गणेश महाराज किनीकर हे वाढवना बु. येथील जेष्ट विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांच्या साईलिला या घरी शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या एकनाथ षष्टी निमीत्त आयोजित दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रम प्रसंगी पहिल्या दिवशी रात्री किर्तन प्रसंगी भाविक भक्तांना उपदेश करताना प्रतिपादन केले.ते यावेळी आपल्या अमृत वाणीतून संताची महती आणि संताचे चरित्र या विषयावर उपदेश केला. श्री एकनाथ षष्टी निमित्त गुलालाचे किर्तन ह.भ.प.नामदेव महाराज उमरगेकर यांचे झाले. यावेळी महाराजांनी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या अंगी असलेले गुण यावर उपदेश केला.अस्पृश्यता त्यांनी शके १५१५ मध्ये कशा प्रकारे नष्ट केली, यावर प्रकाश टाकला.यांच्या उदार अंतकरणामुळे ज्यांना ज्यांना गर्व झाला होता तो कसा नष्ट झाला. यावरील बरेच उदाहरणे सांगून संताची महती पटवून दिली.
या दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रमास प्रा.प्रविण बिरादार,विधीज्ञ प्रमोद बिरादार, प्रशांत बिरादार, प्रा.प्रतिभा कोडग्याळे, सौ.सिमा बिरादार, सौ.उषाबाई भ़ोसले,श्रेयश बिरादार, बालाजी हावरगे,गोविंद लवटे, बाबुराव रेणापुरे,दत्ता उपासे,पिल्लु जाधव,तुकाराम केसगिरे,शिंदे,ज्ञानोबा संगमे, व्यंकटी पुंड,प्रमोद मुंडकर, गणपतराव जाधव,सौ.शोभाबाई सुर्यवंशी,सौ.लताताई सुवर्णकार, अमोल फुलारी,दिपक वाघडोळे,कृष्णा पांचाळ,कैलास लवटे,आकाश लवटे,यादव नागपुर्णे,संजय मुंडकर आदींनी परिश्रम घेतले.