माहेर हॉस्पिटल येथे ५२ महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी
उदगीर (एल.पी.उगीले) : सर्वसामान्या गोरगरिब कुटुंबातील सर्व समाजाप्रती महिलांमध्ये आरोग्याविषयी जाणीव जागृती, जणजागरण करून त्यांना अनेक अनिष्ट चालीरितीतून बाहेर काढुन एका आदर्श समाज उभारणीसाठी आजच्या आधुनिक काळातही अनेक महिला कार्यरत आहेत.त्यापैकी एक समाजसेवावृत्तीच्या डॉ.प्राजक्ता नीतीन गुडे-गुरूडे आहेत. त्यांनी उदगीर शहरातील सर्वसामान्य महिलांना आधार देण्यासाठी माहेर हॉस्पिटलची निर्मिती केली. प्रसिद्ध समाजसेविका डॉ.प्राजक्ता नीतीन गुडे-गुरूडे यांनी बसस्थानक समोरच माहेर या नावाने परिसरातून तालुक्यातून येणाऱ्या गोरगरीब महिलांना माहेरचा आधार मिळावा म्हणून हॉस्पिटलची निर्मिती केली. या हॉस्पिटलच्या अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माहेर मॕटर्निटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटर व उदगीर डॉक्टर असोसिएशन व नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी तसेच माहेर हॉस्पिटल उदगीर च्या वतीने अतिशय महागडी आणि मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातच उपलब्ध असणारी एच.पी.व्ही, डी.एन.ए.टेस्ट, पॕप टेस्ट ची तपासणी माहेर हॉस्पिटल बस स्थानक समोर उदगीर येथे सर्वायकल कॅन्सर स्किनिंग कॅम्प तथा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली.यात ५२ महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलच्या संचालिका तथा समाजसेविका डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे, डॉ.रेखा रमण रेड्डी, डॉ.वर्षा वैद्य, डॉ. सुप्रिया वायगावकर, डॉ.सुलोचना वायगावकर, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी चे तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.