यशवंत विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

यशवंत विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. धुरंदर राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर व्ही व्ही गंपले यांनी प्रकाश टाकला. या समयी उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, बालाजी सोनटक्के, राजकुमार बोराळकर, भीमराव कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन गहिनीनाथ शिरसागर यांनी तर आभार दीपक हिंगणे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!