एकच मिशन जुनी पेन्शन सह अनेक मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी,जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी एकच मिशन जुनी पेन्शन या ब्रिद वाक्या प्रमाणे महाराष्ट्रातील २००५ च्या नंतर लागलेले कर्मचारी त्यांना सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे.ती पुर्ववत चालू करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे संपावर जात आहेत. तेव्हा शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देवणी तालुक्यातील विविध संघटनाच्या वतीने तहसीलदार सुरेश घोळवे यांना सर्व कर्मचारी संघटना समन्वय समिती देवणीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी उमेश पाटील, मलवाडे रामदास, धनराज चिद्रे, किशनराव बिरादार, चंद्रकांत मोठेराव अनिता ढगे, विश्वनाथ उदबाळे,श्रीकांत पताळे,सुधिर साबणे , प्रविण रणदिवे, यांसह अनेक शिक्षक संघटना, आरोग्य संघटना, लिपीक वर्गिय कर्मचारी संघटना पंचायत समिती देवणी , कांबळेव्हि,एस, ,गटविकास अधिकारी,माचेवाड व्हि एम,गुडसुरकर बि. पी. गोपनवाड जि,एन,आल्लापुरेआर एस, भुजबळ आर एच,बावगे एस एन,शिवपुरे आर एस,हैबतपुरे डि,बी, शेख रज्जाक, मुंढे ज्योती, मिरकले यु एस, वाडेकर एस एम, संघटनेचे अध्यक्ष हावा सी, एम, उपाध्यक्ष पाटील शरद, सचिव सुर्यवंशी पी. बी. गाडे ए. एन, सर्व विस्तार अधिकारी संघटना पंचायत समिती यांनी या संपाला जाहीर पाठिंबा दिले आहे.