महिला वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर (एल.पी.उगीले) जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने तसेच इनरव्हील क्लब, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय, आर्य वैश्य महिला महासभा मंडळ, वसुंधरा ग्रुप, आयुवर्धन फिटनेस सेंटर, सखी सहेली मंच, जिजाऊ ब्रिगेड, उदगीर डॉक्टर्स वुमेन्स फोरम, नवदुर्गा सेवाभावी संस्था, सखी मंच या विविध सहयोगी संघटनांच्या सहभागातून शहरातील छत्रपती राजर्षी शाहू चौक ते हुतात्मा स्मारक दरम्यान कॅन्सर मुक्तीचा संदेश देत वॉकेथॉन (पदयात्रा) काढण्यात आली.

शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका महानंदा बहेनजी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात करण्यात आली. या वॉकेथॉनचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. यावेळी डॉ. प्राजक्ता गुरुडे यांनी कर्करोग लक्षणे, निदान व उपचार या सोबतच आजची बदलती जीवनशैली या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महानंदा बहेनजी यांनी यावेळी एकत्र कुटुंब पद्धती व महिलांचे आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष रामेश्वर निटूरे, सचिव व्यंकटराव कणसे, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के, उत्तरा कलबुर्गे, सुजाता पंदिलवार, शुभांगी वट्टमवार, स्नेहा चणगे, स्वाती गुरुडे, चारुशीला पाटील, सूर्यशीला मोरे, मीरा आनंतवाळ, दिपाली औटे, डॉ. संगीता कोटलवार, प्राचार्या उषा कुलकर्णी, सुजाता गुजलवार, रमा वाघमारे, वर्षा धावारे, चंद्रकला बिरादार, सुनंदा सरदार, डॉ. तृप्ती दाचावार, संगीता सोनाळे, सुनीता स्वामी सह रोटरीचे मंगला विश्वनाथे, सुनीता मदनुरे, अन्नपूर्णा मुस्तादर, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. रश्मी चिद्रे, डॉ. सुधीर जाधव, विशाल जैन, रविंद्र हसरगुंडे, विजयकुमार पारसेवार, अनिल मुळे, गजानन चिद्रेवार, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. विजयकुमार केंद्रे, संतोष फुलारी, लक्ष्मीकांत चिकटवार यांची उपस्थिती होती.

About The Author