लासूने सुनील यांचे रक्तदानाचे शतक

लासूने सुनील यांचे रक्तदानाचे शतक

उदगीर (एल.पी.उगीले) : नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटरच्या स्थापनेपासून शंभर वेळेस रक्तदान करण्याचा विक्रम फक्त दोघांनीच पूर्ण केला. डॉ. रामेश्वर बाहेती यांनी आणि तदनंतर शिरूर अनंतपाळ येथील सुनील वैजिनाथ लासूने यांनी! अगदी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुनील यांना रक्तदानाचे एक वेड म्हणावे लागेल, एवढी या चळवळीवर त्यांची भक्ती आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी रक्तदानाचे शतक करून सर्व तरुणांना एक प्रेरणा दिली आहे. या महा दानाचे औचित्य साधून नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने बी टी ओ डॉ शेटकार बस्वराज यांनी सुनील लासुने यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!