नर्सेस,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्याचे तत्काळ निराकरण करा – श्रीमती त्रिशाला शंबाले

नर्सेस,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्याचे तत्काळ निराकरण करा - श्रीमती त्रिशाला शंबाले

अतनूर (एल.पी.उगीले) : सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी. नवीन पेन्शन योजना एन.पी.एस.रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना ओ.पी.एस.पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, सर्व रिक्त पदे तात्काळ भरा, आरोग्य विभागास अग्रक्रम द्या, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्यांचे तत्काळ निरंकारण करा, अशी मागणी बेमुदत संपामध्ये सामील झालेल्या जळकोट ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका श्रीमती त्रिशाला शंबाले यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने केली आहे. अतनूर ता.जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचारी संपात सहभागी असून आपल्या मागण्या मान्य कराव्यात. त्यासाठी सरकारी, निमसरकारी, महापालिका, नगरपालिका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आदी सहभागी झाले आहेत. या संपात जळकोट ग्रामीण रूग्णांलयाच्या अधिपरिचारिका शंबाळे त्रिशाला, सुनंदा वाघमारे, अंजली डोंगर्गे, सुचिता बिरादार, शिरसाट गवळण, कनिष्ठ सहायक पी.ए.सूर्यवंशी, आरोग्यसेविका एस. एस. महाजन, आरोग्य सेवक एम.जे.शेख, आरोग्य सेवक व्ही.आर.भद्रे, श्रीमती एस.एस.महाजन, परिचर पी.एम.घोडके तसेच इतर कर्मचारी बेमुदत संपामध्ये सामील आहेत.

About The Author