दृष्टीमध्ये काही अस्वस्थता जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका – डाॅ.सुदाम बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले) : मानवाच्या शरिराचा प्रत्येक अवयव हा महत्वाचा असतो.त्यापैकी डोळा हा जास्त म्हत्वाचा घटक आहे.त्यामुळे डोळ्याचा आजाराकडे दुर्लक्ष करू नका, असे विचार डाॅ.सुदाम बिरादार यांनी व्यक्त केले.ते काचबिंदू सप्ताह निमित्त उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रामप्रसाद लखोटीया हे होते.तर मंचावर उपस्थित नेत्रतज्ञ डॉ.आर्चणा पवार,नेत्रतज्ञ डाॅ.मुक्ता कदम-वरवटे, डाॅ.निकिता भोसले,डाॅ.गिल मॅडम,डाॅ.वर्मा उपस्थित होते.
पुढे बोलतना बिरादार म्हणाले, जर एकाद्या रूग्नाला दुर्दैवाने,काचबिंदू झाला तर इलाज आहे. जर एखाद्या पेशन्टला काचबिंदूचा त्रास होत असेल तर त्याचे आयुष्यभर निरीक्षण करावे लागते.त्यामुळे औषधोपचार, लेसर उपचार आणि शस्त्रक्रिया वापरून अतिरिक्त दृष्टी कमी होणे कमी करणे किंवा थांबवणे शक्य आहे.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकवून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे तज्ञ डाॅक्टरच्या सल्याने निदान करूण घेणे, जर तुम्हाला तुमच्या दृष्टीमध्ये काही अस्वस्थता जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
बालकांमध्ये काचबिंदूसाठी शस्त्रक्रिया महत्त्वाची असते,ही त्यांच्या आणि प्रौढांच्या उपचारांतील भिन्नता असते.अनेकदा पुन्हा पुन्हा शस्त्रक्रिया कराव्या लागतात. सगळ्या शस्त्रक्रियांचा उद्देश आंतरिक दाब कमी करण्याचा असतो. साधारणता ८५ % केसेस औषधोपचाराने नियंत्रित करता येतात.लहान मुलांमध्ये उपायाबरोबरच अपायही होऊ शकतात. काचबिंदू निदान झालेल्या ना अनेकदा आयुष्यभराच्या उपचार पद्धतीची गरज असते.असे ते म्हणाले.