कु.हर्षदा विनोद पाठक हि मराठवाड्यातून गणित विषयात प्रथम

कु.हर्षदा विनोद पाठक हि मराठवाड्यातून गणित विषयात प्रथम

लातूर (एल.पी.उगीले) : कु.हर्षदा विनोद पाठक बी.एस्सी तृतीय वर्षे या वर्गात देवगिरी महाविद्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे शिकत आहे. तिने यशवंत महाविद्यालयाच्या नांदेड यांच्या वतीने आयोजित केलेल्या गणितातील 19 व्या अंतिम स्तरावरील मराठवाडा मॅथेमॅटिकल नांदेड स्पर्धेत भाग घेतला आणि मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी 16 मार्च 2023 रोजी कु.हर्षदा विनोद पाठक यांना प्रथम क्रमांकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कु.हर्षदा विनोद पाठक मराठवाड्यातून गणित विषयात प्रथम क्रमांक पटकावला, गणित स्पर्धा मध्ये लातूर, धाराशिव,बीड, परभणी, हिंगोली, नांदेड सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.हर्षदाने मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल व्हि.सी.बोरकर निमंत्रक जिल्हा समन्वयक मॅथेमॅटिकल महाराष्ट्र राज्य,डी.एन.पांडे हेड मॅथेमॅटिकल महाराष्ट्र राज्य, बी.बी.कुलकर्णी जॉईंट सेक्रेटरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तिच्या या कामगिरीबद्दल देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक व मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक छत्रपती संभाजीनगर यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!