दि.उदगीर अर्बन को ऑप बँकेंच्या चेअरमनपदी गुरुडे तर व्हा.चेअरमनपदी पेंन्सलवार यांची बिनविरोध निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संस्थापक चेअरमन तथा सहकार महर्षी शिवाजीराव गुरुडे यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलचे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले असून उद्योग,,व्यापार वाढीस लागावा,शेतीपूरक व्यवसाय उभारले जावेत यासाठी तरूणमंडळींना वेळेत व आवश्यक तेवढे कर्ज उपलब्ध व्हावे. हा उद्देश ठेऊन बँकेंची स्थापना झालेली आहे. स्थापनेपासून नावारूपाला आलेल्या दि.उदगीर अर्बन -को -ऑपरेटिव्ह बॅंक ली.उदगीर सहकार क्षेत्रात एक आगळे वेगळे स्थान खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांच्या हृदयात निर्माण केले आहे. ही बँक हळूहळू मराठवाडा भर पसरू लागली आहे.उस्मानाबाद ,लातूर, नांदेड हे कार्यक्षेत्र असुन लातूर जिल्हास्तरावर एक तर उदगीर येथे मुख्यालयी एक शाखा आहे , नांदेड जिल्ह्यातील लोहा, नायगाव बाजार, देगलूर जिल्हयात शाखा कार्यरत आहेत. अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ व जलद सेवा देणारी बॅक म्हणून दि.उदगीर अर्बन को ऑप बँकेंचा लौकीक आहे. शेतकरी आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत, गरजूंना जलद गतीने कर्ज उपलब्ध करून देणे हा बॅकेचा मुख्य उद्देश आहे. शहरी आणि ग्रामीण विकासात योगदान देत असलेल्या बँक स्थापनेचा उद्देश सफल करण्यासाठी नुतन संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे. दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी सर्व सभासदांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते चेअरमन पदी शिवाजीराव गुरुडे यांची तर व्हा. चेअरमन पदी रूक्मन पेंन्सलवार यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी नूतन संचालक मंडळ सोनवणे नवनाथ, पाटील बालाजी, गुरमे बाळासाहेब,बाहेती कलपेश, महाजन उमेश,गुरूडे अनिरुध्द, पाटील भास्कर,धनुरे अंकेश, वाकुडे सुमित, सौ. पवार छाया, पेन्सलवार सरोजा यांची उपस्थिती होती. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक एस. आर. नाईकवाडी जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर व बी. एस. नांदापूरकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडीबद्दल नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.