बदलत्या तापमानामुळे आजारात वाढ, वेळीच दक्षता घ्या – डॉ. तेलगाने

बदलत्या तापमानामुळे आजारात वाढ, वेळीच दक्षता घ्या - डॉ. तेलगाने

उदगीर (एल. पी. उगीले) : सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, यामुळे ताप, सर्दी, खोकला असे आजार वाढले आहेत. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे विषाणूंच्या संसर्गात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इन्फ्लुएंझासह कोरोना रुग्णांमध्ये ही वाढ झालेली आढळून येत आहे. त्यामुळे औषधीची मागणी वाढली आहे. मात्र आपल्याला कोणत्याही आजाराची लक्षणे आढळून आल्यास परस्पर औषधी न घेता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शरदकुमार तेमगाने यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने बदल होत आहे, दुपारी तीव्र उन्हाचे चटके तर पहाटे गारवा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी जोरदार पाऊस, गडगडात, वादळ असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून इन्फ्लुएंझा हा विषाणू मुळे होणारा आजार आहे. याचे अर्थात इन्फ्लुएंझाचे “ए”, “बी”, “सी”, “डी” असे प्रकार आहेत. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये “ए” या उपप्रकारातील इन्फ्लुएंझाचा संसर्ग होत आहे. जनतेने घाबरून न जाता, योग्य वेळी तपासणी करून घ्यावी. तसेच वातावरणात सतत बदल होत असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता असते, जर शरीराचे तापमान बिघडले तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. विषम वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण झालेले असते. त्यामुळे रुग्णाला पटकन विषाणूचा संसर्ग होत असून त्यातून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचेही डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी सांगितले. वायरल इन्फेक्शन म्हणून ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वसामान्यपणे सरळ औषधी दुकानातून अनेक जण परस्पर तपासणी न करताच औषधी घेत आहेत. मात्र कित्येक वेळा अशा पद्धतीने औषध घेणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे घाबरून न जाता, प्रत्येकाने तपासणी करून घेऊनच औषध घ्यावे. तसेच वेळोवेळी शासन आणि प्रशासनाच्या वतीने आरोग्याच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असेही शरदकुमार तेलगाणे यांनी सांगितले आहे.

About The Author

error: Content is protected !!