डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाचन संकल्प करून साजरी करा – शरद शिंदे
उदगीर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून देशात कोणाचे महासंकट आहे. देश व राज्य कोरोना संकटाचा सामना करत असून यातच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, चळवळीचे फार मोठे नुकसान होत आहे .सामाजिक चळवळीमुळे मुलावर संस्कार रूजविता येतात व महापुरुषाच्या विचाराचे आचरण जीवनात करता येते. परंतु मागच्या एक वर्षापासून सामाजिक, धार्मिक, व शैक्षणिक कार्यक्रमावर बंदी घातली असून कोणतेही कार्यक्रम घेता येत नाही.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल हा दिवस देशात नव्हे तर जगात मोठ्या थाटा-माटात उत्साहाने साजरी होत असते.कोरोना महामारी मुळे मागील एक वर्षापासून जयंती साजरी करता येत नसल्यामुळे केंद्र शासन व राज्य शासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घरीच वाचन संकल्प करून जयंती साजरी करूया. आजच्या संगणक व फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्रामच्या जमान्यात वाचन संस्कृती ही दिवसेंदिवस लोप पावत चालली असून आजच्या प्रत्येक व्यक्ती व तरुण मुलं-मुली यांनी महापुरुषाच्या साहित्य कडे लक्ष दिले पाहिजे व त्या साहित्याचे वाचन करून सुखी जीवन जगण्यासाठी मार्ग स्वीकारला पाहिजे .जीवन सुखी व मंगलमय करण्यासाठी महापुरुषाच्या विचाराचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारावे म्हणूनच 14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 तास वाचन संकल्प करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊ या व कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडू या…