आमदार बाबासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेतली व ती कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे माझी तब्येत अत्यंत चांगली असुन मी ठणठणीत आहे. माझी कोणीही काळजी करण्याचं कारण नाही मी डॉक्टरांच्या देखरेखेखाली हाॅस्पीटल मध्ये उपचार घेत आहे तसेच तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने व परमेश्वराच्या आशीर्वादाने लवकर बरा होऊन आपल्या सेवेत पूर्णपणे बरा होऊन लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईल, तेव्हा कोणीही काळजी करू नये व आपणही घरी राहून सुरक्षित राहावे अशी विनंती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.