लातूरात कोरोना कहर; 1647 कोरोनाबाधित
3 रुग्णांचा मृत्यु; 1820 अहवाल प्रलंबित
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 32655 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1647 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 3 रुग्णाचा मृत्यु झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1908 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 647 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3979 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1000 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या43622 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 10160 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 807 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 32655 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 663 आहे. आरटिपीसीआर मधील 1820 अहवाल प्रलंबित आहेत.