गुडसूर येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन

गुडसूर येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन

गुडसूर(एल.पी.उगीले) : माऊली शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन,गुडसूरचे उपसरपंच बालाजी देमगुंडे यांच्या हस्ते झाले. भाजारभावा पेक्षा सातशे रु जास्त भाव हरभरा खरेदी केंद्रावर मिळणार असल्याचे कंपनी चेअरमन अविनाश वर्षे म्हणाले.

हे खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे गुडसूर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.याप्रसंग विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन कालिदास दंडिमे,उदगीर मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिल लांजे,पत्रकार नागेश नवाडे, माजी सरपंच राजेंद्र मुडपे, शेतीनिष्ठ शेतकरी संजय हेळंबे, विश्वनाथ होळसंबरे, उत्तम मलकलपट्टे, संजीव बंडे, प्रकाश मुडपे, नारायण नलावडे, नवनाथ जगळपूरे , गोविंद मुडपे , बबनदेव जोशी, ओमकार वलसे तसेच हिपरगा,घोणसीचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!