डाॅ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सय्यद ताहेर हुसेन तर कार्यअध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांची बिनविरोध निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची कार्यकारणी निवडीसाठी हुतात्मा स्मारक येथे अॅड प्रभाकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सय्यद ताहेर हुसेन यांची तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बैठकीस मारोतीराव चौधरी गुरुजी, सत्यवतीताई गायकवाड , मायाताई कांबळे , गजानन सताळकर, शेख समीर , बापूसाहेब कांबळे, संजयकुमार एकुर्केकर, नवनाथ गायकवाड, संजय काळे, अभिजित सोमवंशी, नामदेव बामणे, अण्णासाहेब बनशेळकीकर, शिवमूर्ती उमरगेकर, अनिल सोमवंशी, नामदेव भोसले, जावेद शेख, मोमीन अजहर, अजित शिंगे, प्रा. मदन पाटील, सतिश वाघमारे, प्रितम सुर्यवंशी, अरुण उजेडकर, राहुल सोनवणे, सिध्दार्थ शिंदे, दत्ता कांबळे, प्रभूदास गायकवाड, सुनिल मादळे, कपील मादळे, नामदेव सावळे, राजीव कांबळे, सचिन जाधव, कपिल शिंदे, गौत्तम सोमवंशी, संग्राम अंधारे, सुभाष कासले, नितीन एकुर्केकर, अजित शिंदे, माधव उदगीरकर, मोतीलाल डोईजोडे, आकाश कस्तुरे, सचिन शिवशेट्टे, विक्रम हलकीकर, राहुल सोनवणे, राहुल कांबळे, संजय कांबळे, जवाहरलाल कांबळे, अजय पारखे, नरेंद्र उजेडकर व विविध सामाजिक, राजकीय पक्ष संघटनाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आंबेडकरप्रेमी जनता यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन धनाजी बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक कांबळे यांनी मानले.
