ग्रामपंचायत ने गटारातील गाळ नाही काढल्यामुळे दुर्गधित घाण पाणी रस्त्यावर
वाढवणा बु. (हुकूमत शेख) : वाढवणा बु, येथील गटारीचे घाण दुर्गंधीत पाणी रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यावर बाजार पेठेतील, गटारीतील घाण काढले नसल्याने नाल्या,गटारी तुडुंब भरून घाण दुर्गधित पाणी रस्त्यावर वाहात असल्यामुळे वाहने जाताना चक्क पादचाऱ्याच्या अंगावर घाण दुर्गधित पाणी उडून अंगावरील पोशाख खराब होत आहेत. मुख्य रस्त्यावरच गटारी घाण गाळेनी भरलेली आहेत, तर गल्लीबोळातील गटारीचा विचारच न केलेला बरा, अशी गत झाली आहे. संबंधित प्रशासन लक्ष घालुन गटारीतील पुर्ण बुडातून गाळ काढून बाजार पेठेतील गटारी स्वछ करून रस्त्यावर फिरणाऱ्या पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासातुन मुक्त करताल का? असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे. दर बुधवारी भाजी पाल्याचा आठवडी बाजार या रस्त्यावरच भरत असतो. अनेक वेळा गावातील नळाला पाणी सुटले की, तुडुंब भरलेल्या गटारीचा पाणी बाजार भरलेल्या भाजी पाल्यात जाऊन भाजी पाल्याची नासधूस होऊन, हजारो रुपयांचे नुकसान देखील अनेक वेळा झाले आहे. बाहेरील भाजी पाला व्यापाऱ्यांचे अर्थिक नुकसान देखील झाले, मात्र संबंधित स्थानिक प्रशासनास गटारीचा खराच त्रास लोकांना होताना दिसत असुन देखील गटार बुडातून स्वछ का केली जात नसेल? हा न उलगडणारा प्रश्न सामान्यांना भेडसावत आहे. आता तरी वरिष्ठानी वाढवण्याचा दौरा करून पुर्ण गावात चक्कर मारून ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत, संबंधित ग्रामपंचायत एवढा अनुदान गावात येऊन देखील साध्या गटारी वर्षातून एकदा तरी काढल्यात का? याची साधी विचारपूस संबंधित जिल्हा तालुका प्रशासन का? करत नाही, अशी चर्चा देखील होताना दिसत आहे. गटारीचे अस्वच्च, घाण दुर्घधित पाणी रस्त्यावर येउन माणसाच्या अंगावर उडत असुन अनेक प्रकारचे साथीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमीत कमी वर्षातून एकदा गावातील गल्लीबोळातील व अंगणवाडी जवळील गटारी स्वछ करण्याची चर्चा जोरात चालु असुन वरिष्ठानी लक्ष घालून गावातील समस्याचे निराकरण करण्याची गरज भासत असल्याची चर्चा सामान्यातून होत आहे.
