कासार सिरसी परिसरात गारांचा मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसीसह परिसरात विजेच्या कडकडासह गारांचा मोठा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास गारांचा मोठा मारा झाल्याने शेतकऱ्यांचे तोंड घाशी आलेले पीक ज्वारी मका हरभरा गहू कांदा,अन्य रब्बी पिके व द्राक्षे आंबा अन्य फळांचे मोठे नुकसान झालेले आहे.

यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आलेला आहे. हा वर्षच कठीण जाताना दिसत आहे खरीप हंगामामध्ये मुसळधार अतिवृष्टी झाल्या असल्याने सर्वच खरीप पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत होता ते अडचण बाजूला ठेवून आता रब्बी पिकाचे चांगले उत्पन्न काढून आपली उपजीविका भागवावे या प्रयत्नात असताना हा अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा स्वप्न स्वप्नच राहिल्याचे दिसून येत आहे.. खरीप पिकाच्या थोडा बहुतअसलेल्या मालाला भावच नसल्याने अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना या अवकाळी पावसाने जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. तरी सरकारने तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
