पानगाव येथे शेतकरी संघटनेचा अन्नत्याग सुरू
पानगाव (प्रतिनिधी) : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आजपर्यंत देशात सुमारे ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.याची सुरुवात १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हान येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी संपूर्ण कुटुंबासह केलेल्या आत्महत्येने झाली.म्हणून देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार व तंत्रज्ञान स्वतंत्र्य मिळणे आवश्यक आहे.या सर्व बाबींकडे सरकारने गांभीर्याने बघावे.याकरीता १९ मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस म्हणून अन्नत्याग केले जाते.याचाच भाग म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने पानगाव ता.रेणापूर येथे हुतात्मा रमेश मुगे,व युगात्मा शरद जोशी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अन्नत्यागास सुरुवात केली आहे.
यावेळी शेतकरी संघटना न्यास चे सदस्य अनंतराव देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते माधव मल्लेशे, माधव कंदे, शिवाजी पाटील नदीवाडीकर,पनगेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन किशनराव भंडारे, जेष्ठ नेते रमेश चिल्ले, प्रा.डॉ.ज्ञानदेव राऊत, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष कालिदास भंडे, शंकर निला, वसंत कंदगुळे, किशनराव शिंदे,माजी शिक्षक श्री.डोणे सर, इब्राहिम शेख, गोविंद भंडे, पंडीत देशमुख, नारायण घोरपडे, करण भोसले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, बाबाराव पाटील, संपर्क प्रमुख मदन सोमवंशी, हरिश्चंद्र सलगरे,मलकु पाटील, जनार्दन डाके,चंद्रकांत व्यवहारे, बाळकृष्ण चव्हाण,भिमसिंग राजपूत, व्यंकटराव अनामे, दत्ता कुलकर्णी, रमाकांत वाघमारे, मुरलीधर डोणे, आदींसह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
