आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते मसला सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील मौजे मसला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वातील भाजपा प्रणित संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले. काँग्रेसच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. विजयी सर्व उमेदवारांचा आ. रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
लातूर तालुक्यातील प्रमुख सोसाट्यापैकी मसला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही एक आहे. या सोसायटीचे मसला, पिंपळगाव आंबा, भोसा आणि निळकंठ या चार गावचे कार्यक्षेत्र असून संचालक पदाच्या 13 जागेपैकी एका जागेवर भाजपाच्या सारिका नाळापुरे या बिनविरोध निवडून आल्या तर उर्वरित 12 संचालक पदाच्या जागेसाठी 19 मार्च 2023 रोजी मतदान होऊन निकाल जाहीर झाला. त्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वातील भाजपा प्रणित स्वयंभू निळकंठेश्वर सहकार ग्रामविकास पॅनलचे सर्वच्या सर्व शंभरहून अधिक मताच्या फरकाने विजयी झाले.काँग्रेसच्या पुढार्यांनी विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवूनही त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. या निवडणुकीत सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत वांगस्कर यांच्यासह शाहूराज धुमाळ, बाळासाहेब निलंगे, मोहन पिसाळ, नामदेव बिडवे, मेघराज पिसाळ, बाबू रहीम शेख, प्रभू औवताडे, रामभाऊ आल्टे, सुखदेव कुकर, सौ. राजेश्री पिसाळ यांचा दणदणीत विजय झाला. नवनिर्वाचित सर्व मसला सोसायटीच्या संचालकाचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित सोसायटीच्या सदस्यांनी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून काम करावे, शेतकऱ्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे सांगून मसला, भोसा, पिंपळगाव आणि निळकंठ या चारही गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक रुपयाचा निधी कमी पडणार नाही. अशी ग्वाही यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे यांच्यासह भैरवनाथ पिसाळ, दीपक वांगस्कर, अशोक सावंत, श्याम वाघमारे, सुभाष धुमाळ, अच्युत भोसले, समाधान कदम, बाबा भिसे, अण्णासाहेब कदम, बापूराव बिडवे, सातलिंग धुमाळ, गुणवंत बिडवे, संभाजी लोखंडे, मधुकर वांगस्कर, नर्सिंग वांगस्कर, बसलींग बिडवे, बापू आंबेकर, सौदागर अवताडे, रुकमानंद नाळापुरे, तानाजी ढोबळे, शिवदास भुजबळ, सिद्राम चव्हाण, बापू देवकर, अच्युत पिसाळ, संतोष पिसाळ, महादेव बिडवे, रावण पिसाळ, दशरथ भुजबळ, मंचक खोशे, नामदेव मांडे, रामेश्वर पाटील, बसलींग धुमाळ, मल्लिकार्जुन बिडवे, रामेश्वर वांगस्कर, आत्मलिंग रिंगणकर, हनुमंत राजमाने, रामभाऊ पिसाळ, औदुंबर पवार, रावसाहेब पिसाळ, श्रीमंत वांगस्कर, शिवाजी वांगस्कर, गुप्तलिंग स्वामी, बाबासाहेब मांडे यांच्यासह चारी गावातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.