लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या वतीने एक मुष्ठी धान्य उपक्रम संपन्न

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या वतीने एक मुष्ठी धान्य उपक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो.याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून,विस्तार सेवाकार्य विभागामार्फत एक मुष्ठी धान्य जमा करण्यात आले.इयत्ता पहिली ते चौथीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवाहन केल्याप्रमाणे या उपक्रमात सहभागी होऊन तांदूळ, गहू, ज्वारी, विविध दाळी व गुळ संकलित केले.

या उपक्रमातून जमा झालेले सर्व धान्य उदगीर परीसरातील पालावरील वस्तीतील गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी एक मुष्ठी धान्य उपक्रमाची माहिती सांगितली.यावेळी भारतीय भटक्या जाती जमाती संघटना व नाथ जोगी समाज नांदेडचे अध्यक्ष साईनाथ शिंदे,शाळेतील अभ्यासक्रम मंडळ प्रमुख बाळाराम बानापुरे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख माधव केंद्रे, मूल्यमापन प्रमुख अतुल गुरमे,कार्यालय प्रमुख श्याम गौंडगावे, जगन्नाथ वाकडे उपस्थित होते.पालावरील वस्तीतील लोकांनी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या ‘एक मुष्ठी धान्य ‘उपक्रमाचे खूप कौतुक केले.

About The Author

error: Content is protected !!