प्रथमच नऊ जन पवित्र उमरा ( हज ) साठी एकाच विमानाने मक्का मदिनाला रवाना होणार

प्रथमच नऊ जन पवित्र उमरा ( हज ) साठी एकाच विमानाने मक्का मदिनाला रवाना होणार

वाढवणा बु. (हुकूमत शेख) : इस्लाम धर्मात सर्वात महत्वाचे पवित्र उमरा व हज साठी श्रीमंतातील श्रीमंत व गरिबातील गरीब, सामान्य, मुस्लिम महिला, पुरुष एकच दुवा करतात की अल्ला आम्हाला उमरा हज नशीब फर्मा, तेथे नशिबवानच स्त्री पुरुषच जाणार ते इस्लाम धार्मियांचा पवित्र स्थळ आहे. असेच नशीबवान एकाच गावातील ग्रामीण भागातील वाढवणा बु. येथील रहिवाशी असलेले नऊ जण पवित्र उमरा (हज )करिता निघाले असुन त्यात सहा महिला व तीन पुरुष आहेत. त्या पैकी अब्बासअली हसन अली धावडे व त्यांच्या अर्धांगिनी हनिफा अब्बासअली धावडे हे दोघे पती पत्नी सौदीया अरब पवित्र उमरा (हज ) साठी गावातील उदगीर वाढवणा बस ने सायंकाळी 6 वाजता बस मध्ये बसुन उदगीर कडे प्रयाण केले. यावेळी गावातील इष्ट मित्र परिवारातील सर्व सदस्य, मुले, सुना, मुली, जावाई, शेजारी व गावातील सर्व महिला पुरुष, मुले, मुलींनी बस मध्ये बसते वेळेस सर्वांनी गळा भेट व हातात हात देत, सर्वांचे डोळे अश्रूनी पाणावले होते. उमरा (हज )ला जाते वेळेस त्यांना उदगीर पर्यंत सोडण्या करिता महिला पुरुष, महिला सन्मान अर्धा तिकिटाचा लाभ घेत व जेष्ठ व अमृत योजनेचे शून्य तिकिटाचे लाभ घेत अब्बासअली हनिफा बी धावडे यांना पवित्र उमरा करिता पाठवण्यासाठी गेले. तसेच गावातून एकुण 9 जण उमरा मक्का मदिना सौदीया अरब साठी शमीमबी गोलंदाज, खालेदाबी हवलदार, खैरूनबी मणियार, इस्माईलखां पठाण व त्यांची पत्नी, सईद मुंजेवार व त्याची आई मुमताज मुंजेवार अशा सहा महिला, तीन पुरुष पवित्र उमरा मक्का मदिना (हज) साठी गेले आहेत. दि.21 मार्च मंगळवार रोजी एक वाजता शमशाबाद एरोप्लेन हैद्राबाद ने मक्का मदिना उमरा साठी एकाच गावातील नऊ जण रवाना होणार असुन ते पुर्ण एक महिना पवित्र मक्का मदिना व पवित्र रमजान महिन्याची इबादत करण्यासाठी उमरा (हज )साठी अल्लाने त्यांना बोलावले असुन ते नशिबवान आहेत. त्या ठिकाणी जाऊन सर्वासाठी दुवा करणार असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी हुकूमत शेख यांना अब्बास अली धावडे यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!