‘भेटी लागे जीवा‘ या कार्यक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

‘भेटी लागे जीवा‘ या कार्यक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

दयानंद कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ आणि संगीत व सांस्कृतिक विभागाचा उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि संगीत व सांस्कृतिक मंडळाच्या यांच्या वतीने ‘भेटी लागे जीवा‘ हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर,उपप्राचार्य प्रा.अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ.संदिपान जगदाळे, माजी विद्यार्थी संघाचे प्रभारी डॉ.अंकुशकुमार चव्हाण, संगीत विभागप्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी, माजी विद्यार्थी तथा उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे, उस्मानाबाद माजी विद्यार्थी तथा उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, सोलापूर, जयमाला गायकवाड हे मंचावर उपस्थित होते.

या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मागील ३१ वर्षांपासूनचे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत व सांस्कृतिक विभागातून २० विद्यार्थी हे चित्रपट व दूरदर्शन कलावंत घडले आहेत. याबरोबरच १५ माजी विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेतून उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत. तसेच सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, न्यायव्यवस्था आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकूण ५० गुणवंत, ज्ञानवंत व प्रतिभावंत माजी विद्यार्थ्यांचा ‘दयानंद रत्न‘ प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. याबरोबरच सांस्कृतिक विभागाचे माजी प्रभारी डॉ. शिवाजी जवळेकर, डॉ. अंजली जोशी डॉ. सुनील साळुंके, डॉ. बालाजी घुटे, डॉ. अशोक वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती शिवकुमार ढगे यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते काही गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी शिवराज बोकडे, डॉ. संपत काळे, पोलीस उपअधीक्षक सुरेखा चव्हाण,औरंगाबाद,डॉ ईश्वर बिदादा, जितेंद्र बनसोडे, नायब तहसीलदार हरिदास काळे, डॉ.मदारी शेख, पोलीस अमलदार राखी गायकवाड, सीता समुद्रे, वर्षा जवळगे या माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या आठवणींना उजाळा दिला व महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. डॉ गोपाल बाहेती यांनी प्रशस्तीपत्राचे वाचन केले.

६०० माजी विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत कमानी, रंगीबेरंगी रांगोळ्या, तुताऱ्यांचा निनाद अशा मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ०८ वाजेपर्यंत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अत्यंत देखणा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व माझे विद्यार्थ्यांनी मिष्ठांना भोजनाचा आनंद घेऊन तृप्तीची ढेकर दिली. यामध्ये जवळपास ५ तास माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार पद्धतीने हसत खेळत निवेदन महाराष्ट्राचा विनोदीवीर बालाजी सुळ यांनी करत सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार केला. प्रा दत्ता ओव्हाळ यांनी भारुड सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आसावरी बोधनकर यांनी ‘मेरे ढोल ना‘ हे हिंदी गीत गायले. प्रा.वैभव माने यांनी ‘जिजाऊ सावित्री रमाई‘ हे मराठी गीत सादर केले.शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी ‘ राजमाता जिजाऊ‘ यांचा पोवाडा तूच करून असतो त्यांना रोमांचित केले. राजन सरवदे यांनी ‘भेटी लागे जीवा‘ या कार्यक्रमाला साजेल असे दयानंद कला महाविद्यालयावर उत्स्फूर्त गीत तयार करून ते सादर केलं. तेजस धुमाळ याने स्वतंत्र तबला वादन करून दाद मिळविली. विजय मस्के याने दयानंद कला महाविद्यालयावरती बनवलेलं टायटल साँग सादर केले. माजी नगरसेवक विशाल जाधव यांनी गजल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वरांजली पांचाळ हिने ‘सजदा‘ हे हिंदी गीत गायलं. तनुजा शिंदे हिने महाराष्ट्राची अस्सल लोककला असणारी लावणी सादर केली.अभिजीत जाधव आणि राजन सरवदे याने मर्द मराठ्याच पोर हे गाणं सादर केलं. ज्योतिबा बडे व श्रीनिवास बरिदे यांनी सादर केलेल्या बतावणीतून रसिकांचे मनोरंजन झाले.राहुल भालेराव यांनी ‘बोलक्या बाहुल्यांचा खेळ सादर करून सर्वांना हास्याचे फवारे उडवले. कार्यक्रमाची सांगता कु.किशोरी मुर्के हिने सादर केलेल्या भेटी लागे जीवा या गीताने झाली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संतोष पाटील, डॉ. रमेश पारवे, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ.सुभाष कदम, प्रा. विवेक झंपले, प्रा.अंजली बनसोडे, डॉ. सुधीर गाडवे, प्रा. दशरथ ननवरे, प्रा महेश जंगापल्ले, बालाजी सुळ, सुरज साबळे, स्नेहा शिंदे, बालाजी कांबळे, आदित्य कुलकर्णी, गोविंद कांबळे ज्योतिबा बडे, अरुण धायगुडे,मोहन कांबळे, रुपेश सूर्यवंशी,अधिराज जगदाळे, अनंत खलुले, आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!