पाच लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील कुमठा येथील एका विवाहितेस सासरच्या मंडळींनी संगणमत करून गाडी घेण्यासाठी माहेर वरुन पाच लाख रुपये घेऊन ये, म्हणून शिवीगाळ करून, लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. लाथा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला उपाशी पोटी ठेवून घरातून हाकलून दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात पीडित महिलेने उदगीर येथील महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये दाखल केलेली तक्रार परत घे, म्हणून तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. सदरील फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 173/ 23 कलम 498(अ), 323, 504, 506, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील तक्रारीत पीडित महिला बालिका नितीन जोगदंड हिने आपला पती नितीन शेषराव जोगदंड, भाया अशोक शेषराव जोगदंड, मोठी जाऊ ज्योती अशोक जोगदंड, दीर धरमपाल शेषराव जोगदंड, सासू चंद्रकला शेषराव जोगदंड, चुलत सासरा दिलीप विठोबा जोगदंड, चुलत दिर विशाल दिलीप जोगदंड सर्व रा. परळी वेस, साठे नगर ता. अंबाजोगाई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार हिने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 19 ऑगस्ट 2021 ते 18 मार्च 2023 पर्यंत पीडित विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी माहेर वरुन पाच लाख रुपये घेऊन ये, म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला उपाशी पोटी ठेवले. तसेच उदगीर येथील महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची केस परत घे. म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सिरसे हे अधिक तपास करत आहेत.
