पो. नि. गणेश सोंडारे पो.हे.का. कांबळे यांच्या उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव

पो. नि. गणेश सोंडारे पो.हे.का. कांबळे यांच्या उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव

देवणी (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे रुजू झाल्यापासून कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी दर महिन्याला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याचा पायंडा त्यांनी सुरू केला यामुळे पोलीस प्रशासनामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.देवणी येथील पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या कार्यकाळात नऊ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट तपास करून दाखवला. पोलीस प्रशासनात आपल्या कौतुकास्पद कार्याचा ठसा पोलीस अधीक्षक कार्यालयावर उमटविला आहे. जो भारतीय राज्यघटनेचा आदर करतो त्यांचा आम्ही सन्मान करतो, असे म्हणणाऱ्या पोलीस प्रशासनाने कौतुकास्पद कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे व पोहेका विनायक कांबळे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असा फलक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्यद्वारावर लावल्याचे दिसून येत आहे.

पो. नि. गणेश सोंडारे पो.हे.का. कांबळे यांच्या उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव

ही पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या कार्याची पोच पावती म्हणावी लागेल. पोलीस निरीक्षक सोंडारे हे उच्च शिक्षित, संयमी, मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून देवणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांचा पोलीस प्रशासनावर आदरयुक्त दरारा आहे. प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांना मान सन्मानाने वागवुन, कमी पोलीस कर्मचारी असतांना त्यांच्या कडून कामे कसे करून घ्यायचे? ही पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे त्यांच्याकडे चांगली कसब आहे.

देवणी शहर हे कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र यांच्या सिमेवर वसलेलं शहर आहे. अगदी चार पाच किमी अंतरावर या राज्याच्या सीमा आहेत. देवणी, उदगीर, वलांडी ही शहरे जवळ आहेत. ह्या शहराशी आर्थिक व्यवहारासह रोटी बेटीचे सबंध आहेत. या राज्यातील लोकांची वर्दळ चालु असते, तेव्हा कोणत्याही प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून पो.नी. सोंडारे या सीमावर्ती भागावर करडी नजर ठेवून आहेत. या चोरी प्रकरणी दोन्ही पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून आरोपींना मुद्देमालासह अटक केल्याबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!