स्मार्ट ॲचिवर्स कोचिंग क्लासेस मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी स्मार्ट ॲचिवर्स कोचिंग क्लासेस येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात क्लासेसचे विद्यार्थी विविध प्रयोग घेवून सहभागी झाले होते. क्लासेच्या विद्यार्थ्याची बौधिक कामगीरी पाहण्यासाठी आणि त्यांच्या हुशारीचे कौतुक करण्यासाठी कै. रसिका महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा उपप्राचार्य . डॉ शिवाजी सोनटक्के कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर मोहद्दीन मंगरुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्लासेसचे संचालक सरफराज मंगरुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
