आ. अमितभैय्या देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

आ. अमितभैय्या देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक मंत्री.आ. अमितभैय्या विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी गंगापूर- भाकसखेडा चे तरुण चेअरमन विवेक जाधव यांनी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक जाणीव जपणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श युवकांच्या पुढे राहावा, या उदात्त्य हेतूने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोक उपयोगी निर्णय घेऊन काम करण्याची जिद्द विवेक जाधव यांनी दाखवून दिली आहे. सर्वप्रथम गंगापूर येथील जि. प. प्रा.शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भाकसखेडा येथे आई जगदंबादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती रामराव मामा बिरादार,संचालक सुभाष धनुरे, महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुर्यशिलाताई मोरे, लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी चेअरमन शिलाताई पाटील,उदगीर तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष ललिताताई झिल्ले, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष दत्ता सुरनर, बालाजी पाटील नेत्रगावकर ,संतोष पाटील, अमित पाटील, ज्ञानेश्वर भांगे,माजी पंचायत समिती सदस्य माधव कांबळे,बबन धनबा, ज्ञानेश्वर बिरादार, विठ्ठल वळसने, मुकुंदराज पाटील , प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे, गंगापूरच्या सरपंच जयश्रीताई बिरादार, नागभूषण बिरादार, भाकसखेड्याचे सरपंच लिंबाजी खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, माजी सरपंच तुकाराम कांबळे, दयानंद मोरे, रामभाऊ जाधव, नरसिंह जाधव, धोंडीराज बिरादार, चंदरराव बिरादार ,कैलास पाटील, राजू स्वामी, गंगापूरचे उपसरपंच गणेश बिरादार, श्याम जाधव, कृष्णा कोंपले, रामेश्वर मोरे, धनाजी मोरे, साहेबराव तेलंगे यांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जि प प्रा शा गंगापूर येथील सर्व शिक्षक या कार्यक्रमाचे आयोजक विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक जाधव, व्हाईस चेअरमन हंसराज माळेवाडे यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!