बिपिन पाटील मित्र मंडळतर्फे रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती जयवंतराव शिवाजीराव गरुड पाटील यांचा 63 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
उदगीर नगरीत विविध ठिकाणी वृक्षारोपण, विविध शाळेत फळ वाटप,आणि रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला.
बिपिन पाटील मित्र मंडळ उदगीर यांच्या वतीने जयवंतराव पाटील यांचा 63 वा वाढदिवस निमित्त 63 रक्तदान करण्याचा संकल्प करून आज दिवसभरात शाहू चौक येथे विविध वयोगटातील 63 तरुणांनी रक्तदान करत हा संकल्प पूर्ण करत शुभेच्छा दिल्या.या वेळी आकाश हजारे,चैतन्य कुंभारे,सदानंद कल्याने,सूरज वाघमारे, शिवकुमार वडले,तातेराव मुंडे,नितीन स्वामी,तेजस कन्हेरे,वैभव औटे,सिद्धू चंदनकेरे,दयानंद चिखले,मेहबूब शेख,विकास बोधले,गितेश लवराळे,सचिन पुरी,वेंकट बिरादार,मल्लिकार्जुन निलंकर,संजय स्वामी,रामभाऊ सोनटक्के,शुभम खैरमोडे, आकाश पाटील,बालाजी कारभारी,जितेंद्र अंबेसंगे,हिमांशू पाटील,रमेश जांगीड,विनोद भांगावर,बबन कांबळे,सुरेश सताळे,सुनील कसबे,आकाश पाटील,पवन बिरादार, राजगोपाल मणियार,दयानंद साठे,विनायक पाटील,गोपाळ पाटील,सगर जयराम,सीमा कुमार पाटील,स्वप्नील भाले,निखिल चौधरी, गणेश हंगरगे,अन्वर शेख,अविनाश शेटकार, प्रतीक देवणे,प्रणव चौहान,प्रणव देवणे, विश्वजित पवार,रणजित कांबळे,माधव फावडे,चंदू बेद्रे,डॉ प्रशांत चोले,राम रावणगावे,देविदास चिखले,माधव रेड्डी,मिथुन शेळके,ॲड. राजकुमार नावंदर,रामेश्वर बिरादार,सुनील पाटील,मंगेश सावलेसा, अनिल जाधव,निखिल माने,शिवकुमार पांडे,श्रीनिवास रायचुरकर,बिपिन पाटील यांनी रक्तदान केले.
या विविध समाज उपयोगी कार्याचे नियोजन बिपिन पाटील मित्र मंडळ यांनी केले.
या वेळी रक्त संकलनाचे कार्य नागप्पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने डॉ संग्राम पटवारी,पी आर ओ ओमकार गांजुरे,सचिन कोनाळे,अविनाश बिरादार, सपना कांबळे,विनायक टकटवळे,बालाजी खडकपुरे यांनी केले.
