रास्त भाव दुकानदार गरीब शीधाधारकांना धान्य कमी देत असल्याची चर्चा

रास्त भाव दुकानदार गरीब शीधाधारकांना धान्य कमी देत असल्याची चर्चा

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु. येथे चार रास्त भाव दुकान असुन ही चार ही दुकान शासकीय असुन सद्या डिसेंबर 2023 पर्यंत एक वर्ष अंत्योदय, केसरी, पिवळ्या शिधारकांना मोफत धान्य एका युनिट साठी 3 कीलो तांदूळ व दोन किलो गहू नियमानुसार द्यावे लागते. मात्र येथिल काही दुकानदार मनमानी करत शिधापत्रिकाधारकांना कुणाला दोन किलो कमी तर कुणाला एका युनिटचे धान्य कमी देत असल्याची चर्चा जोरात चालु आहे. उदगीर पुरवठा विभाग मात्र कधी गावात येऊन शिधापत्रिकाधारकांशी संवाद साधत नाहीत. दुकानाला भेट देत नाहीत, दुकानदारांना कुणाचीच भीती राहिली नाही. काही दुकानदार तर गोरगरीब अशिक्षित शिधापत्रिकाधारकांना धान्य न देताच अंगठा घेउन धान्य संपले, पुढच्या महिन्यात देऊ. म्हणत म्हणत चार चार महिन्याचे अंगठे घेऊन देखील धान्य देत नाहीत. या बबिकडे संबंधित पुरवठा विभाग लक्ष देईल का ?असा प्रश्न शिधापत्रिका धारकांना भेडसावत आहे. काही दुकानदाराचे म्हणणे आहे, आम्हाला सर्रास धान्य कोठारातून पुरवठा करतेवेळेस पोत्यात पुर्ण 50 किलो धान्य राहात नाही. दोन तीन किलो कमी येत आहे. आम्ही भरती कुटून करणार? तुम्हाला कमी देऊन भरती करावे लागणार. म्हणत असल्याचे ही शिधापत्रिकाधारक बोलताना दिसत आहेत. पुरवठा विभागाने जातीने लक्ष घालुन वाढवणा येथिल गरीब शिधापत्रिकाधारकांची समस्या ऐकून घ्या व अंगठा घेउन चार चार महिन्याचे धान्य एक दुकानदार देत नाही. या दुकानदाराला एवढी हिम्मत आली कुठून ? पुरवठा विभाग या दुकानदारांना युनिट प्रमाणे धान्य पुरवठा करत नाही का ? अनेक जनाला दुकानदार धान्य संपले आहे. अंगठा देऊन जा पुढच्या महिन्यात दोन महिन्याचा घेउन जा म्हणतात. काहींना देतात तर काही गरीब अशिक्षित लोकांना धान्य देतच नाहीत. अशा अनेक तक्रारी येत असुन संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालुन धान्य पुरवठा ग्राहकांना युनिट प्रमाणे पूर्ण धान्य मिळावे, कमी धान्य व धान्य न देता अंगठा घेणाऱ्या दुकानदाराची चौकशी करून कडक कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

About The Author

error: Content is protected !!