आंतरराष्ट्रीय रक्तदान शिबिर अंतर्गत रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीर आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

आंतरराष्ट्रीय रक्तदान शिबिर अंतर्गत रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीर आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : दर वर्षी आंतरराष्ट्रीय रक्तदान शिबिर अंतर्गत रोटरॅक्ट क्लब पूर्ण जगभर रक्तदान शिबिर सप्ताह आयोजित करण्यात येते.या वर्षीचे हे सलग आठवे वर्ष असून या वर्षी रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीर आयोजित महादान 8.0 आंतरराष्ट्रीय रक्तदान शिबिर दुधीया हनुमान मंदिर येथे संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन उदगीर पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले.यावेळी बोलतांना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले.भांडण तंटा,रस्ते अपघात या मध्ये रक्त न वाया घालता नागरिकांनी रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले.या उद्घाटन प्रसंगी दुधीया हनुमान मंदिराचे विश्वस्त ओम विश्वनाथे,उद्योजक रामेश्वर निटूरे,व्यापारी गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आशिष अंबरखाने,संतोष फुलारी,मंगला विश्वनाथे,रवी हसरगुंडे,विक्रम हालकीकर,नागराज बुरांडे,रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीर अमोल पोलावर,सचिव तेजस अंबेसंगे,सुयोग कोटलवार,प्रतीक मांगुळकर उपस्थित होते.
या शिबिरासाठी रक्त संकलनाचे कार्य अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने डॉ.बस्वराज शेटकार,ओमकार गांजुरे,सचिन कोनाळे,सपना कांबळे,विनायक टकटवळे यांनी केले.या वेळी संतोष फुलारी,प्रतीक मांगुळकर,अमोल पोलावार,दीपक खाडे, विशाल जैन,तेजस कोटलवार,शंकर मुक्कावार,महेश उप्परबावडे,सचिन बाळगिडे,तुकाराम म्हेत्रे,परमेश्वर खिंडीवाले,मनोज मुरुडवार,रत्नदीप येरमवार,वैजीनाथ देवशेटवार यांनी रक्तदान केले.

About The Author

error: Content is protected !!