अमळनेर नगरपालिका व्यापारी संकुलाचा लीलावाचा मार्ग मोकळा,याचिकाकर्त्याची माघार

अमळनेर नगरपालिका व्यापारी संकुलाचा लीलावाचा मार्ग मोकळा,याचिकाकर्त्याची माघार

लातूर (एल.पी.उगीले) : अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल पुनर्बांधणी संदर्भात पालिकेने जाहिरात देऊन सदर व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारत बांधणे संदर्भात खताळ बिल्डर्स पुणे यांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून टेंडर दिले होते.सदर व्यापारी संकुलातील पूर्वीचे भाडेकरू मनोहर वसुमल तोलानी व इतर यांनी उच्च न्यायालया रीट याचिका दाखल करून सदर संकुलातील दुकाने त्यांना सवलतीच्या दरात देण्यात यावीत, याकरिता केली होती.मा. उच्च न्यायालयाने प्राथमिक सुनावणी अंती अंतरीम आदेश देऊन सोळा दुकाने विकण्यास मनाई हुकूम दिला होता.
सुनावणी दरम्यान खताळ बिल्डर्स यांचे विधीज्ञ एडवोकेट अजिंक्य रेड्डी यांनी मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, वास्तविक नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मान्यते अन्वये पूर्वीच्या भाडेकरू यांना खताळ बिल्डर्स यांनी दुकाने देणे बंधनकारक नाही. तसेच राज्यमंत्री नगर विकास यांच्या आदेशान्वये नगरपालिका प्रशासनास नगरपालिका स्थावर मालमत्तेची हस्तांतरण नियम पालन करून दुकानाचा जाहीर लिलाव करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले असल्याचा आदेश मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सदर याचिका उच्च न्यायालयातून माघारी घेण्याबाबत विनंती केली.मा. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची विनंती मान्य केली आणि याचिका निकाली काढली. अंतरिम आदेश १० एप्रिल पर्यंत लागू राहतील असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.सदर प्रकरणी बिल्डर्स तर्फे ऍड.अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले. त्यांना एडवोकेट विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!